Health Maharashtra National Social

कानळदा गावाचे उपक्रमशील सरपंच पुंडलिक सपकाळे यांनी थर्मल गण मशीन व आँक्सॉमीटर प्राथमिक आरोग्य केंद्रात उपलब्ध करून दिले

*_कानळदा गावाचे उपक्रमशील सरपंच पुंडलिक सपकाळे यांनी थर्मल गण मशीन व आँक्सॉमीटर प्राथमिक आरोग्य केंद्रात उपलब्ध करून दिले_*

कोरोनाची स्थिती पाहता प्राथमिक आरोग्य केंद्र कानळदा येथे आशा वर्कर, नर्स,सिस्टर यांना रुग्ण तपासणी साठी *थर्मल गण मशीन व आँक्सॉमीटर* यांची आवश्यकता होती. त्यांच्याकडे अपूर्णता असल्याने प्राथमिक आरोग्य केंद्र कानळदा यांनी पुरवठा करण्याची विनंती केली असता.


*ग्रा पं चे उपक्रमशील सरपंच बापूसाहेब पुंडलिक सपकाळे* यांनी साहित्य उपलब्ध करून दिले. सदर साहित्य वाटप करण्यासाठी *जळगाव तालुका पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक रविकांत सोनवणे साहेब* यांच्या हस्ते *डॉ बाबासाहेब आंबेडकर* यांच्या जयंती निमित्त प्राथमिक आरोग्य केंद्र कानळदा येथील डॉ पो शेट्टीवार यांना देण्यात आले.
पोलीस निरीक्षक रविकांत सोनवणे साहेब यांनी आरोग्य केंद्रात अजून काही गरज असल्यास पुरवण्यात येईल असे आवाहन केले. कार्यक्रमाला ग्रामविस्तार अधिकारी बापू कोळी ,प्रमोद चव्हाण, ग्रा पं चे सर्व सदस्य,तालुका पोलीस स्टेशन चे कर्मचारी,आरोग्य केंद्राचे कर्मचारी उपस्थित होते.
डॉ पो शेट्टीवार यांनी ग्रामपंचायत कानळदा चे *सरपंच व सेवानिवृत्त पोलिस उप अधिक्षक पुंडलिक सपकाळे व जळगाव तालुका पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक रविकांत सोनवणे साहेब* यांचे आभार मानले.
प्रतीनीधी *पल्लवी प्रकाशकर*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *