Health Maharashtra National

धुळे दोंडाईच्यात रेमडेसिवर काळ्या बाजाराचे स्टिंग ऑपरेशन : नंदुरबार कनेक्शनही उघड ; कारवाईत दिरंगाई

धुळे दोंडाईच्यात रेमडेसिवर काळ्या बाजाराचे स्टिंग ऑपरेशन : नंदुरबार कनेक्शनही उघड ; कारवाईत दिरंगाई

धुळे दोंडाईचा ( अख्तर शाह )

सर्वत्र कडक निर्बंध असताना काळ्या बाजारात रेमडेसिवर विक्री करणाऱ्या मेडिकल दुकानदाराचे येथील कार्यकर्त्याने रेकॉर्डिंग करून स्टींग ऑपरेशन केले आहे . विशेष म्हणजे या काळ्या बाजाराचे नंदुरबार कनेक्शनही समोर आले आहे . रेमडेसिव्हिर’चा काळाबाजार करणाऱ्या बहादूराचे मोबाईल मध्ये चित्रीकरण झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणात कारवाई करण्यासाठी प्रशासन अद्याप सक्रीय कां होत नाही म्हणून जनतेत संशयाचे वातावरण आहे.

सर्वसामान्यांच्या जीवाशी खेळ खेळणाऱ्या आरोपींवर कारवाईची मागणी होत आहे.

देशातील अनेक राज्यांत कोरोना संक्रमण वाढत असल्याचं दिसून येत असतानाच ‘ऑक्सिजन सिलिंडर’ आणि रेमडेसिविर’ मिळवण्यासाठी नागरिकांची धडपड सुरू असल्याचं समोर येत आहे. कोविडच्या उपचारांत वापरलं जाणारं ‘रेमडेसिविर’ इंजेक्शन १००० पटींनी अधिक किंमतीला विकलं जात आहे. महाराष्ट्र राज्यातील जळगाव नाशिक, मुंबई, नंदुरबारसह आता धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा शहरात मोठ्या प्रमाणात रेमडेसिविर इंजेक्शन काळ्याबाजाराच्या तक्रारी समोर येत आहेत.या संदर्भात एका रुग्णाच्या नातेवाईकाने स्टिंग ऑपरेशन केले आहे. यामुळे काळाबाजार करणाऱ्यांचा चांगलाच भांडाफोड झाला आहे..

धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा येथील स्टेशन भागातील खान्देश मेडिकल एजन्सीने चढ्या दराने रेमीडीसीवर इंजेक्शनची विक्री केल्याची  माहिती समोर येत आहे…

17 एप्रिल रोजी दोंडाईचाच्या एका रुग्णालयात एका महिलेला उपचार सुरू असताना रेमडेसिवेअर इंजेक्शनची गरज भासली. जिल्ह्यात कुठेही इंजेक्शन उपलब्ध न झाल्याने सदर महिलेच्या मुलाने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या विद्यार्थी सेनेचे पदाधिकारी दिग्विजय सिंह राजपूत यांना सदर इंजेक्शन लागणार असल्याचा फोन केला. राजपूत यांनी दोंडाईच्यात असलेल्या खान्देश  मेडिकल एजन्सी वर  फोन केला.  इंजेक्शन बाबत चौकशी केली असता आधी तर मेडिकलच्या मालकाने इंजेक्शन कुठेही उपलब्ध नसल्याचे सांगितले परंतु दिग्विजय सिंह राजपूत यांनी अनेक वेळा विनवण्या केल्यानंतर त्यांनी इंजेक्शन उपलब्ध करून देण्यास बद्दल तयारी दाखवली. यानंतर मेडिकल चालकाचा मुलगा यांनी त्यांना एका ठिकाणी बोलून 2 रेमडेसीवर इंजेक्शनच्या बाटल्या दिग्विजय सिंग राजपूत यांना अडीच हजार रुपये प्रमाणे पाच हजार रुपये घेऊन दिल्या. या संपूर्ण घटनेचे दिग्विजय सिंग राजपूत यांनी मोबाईल मध्ये चित्रीकरण केल्यानंतर हा काळाबाजार उघडकीस आला. यानंतर यासंदर्भात जिल्हाधिकारी यांच्याकडे याबाबत तक्रार देखील करण्यात आली आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे जिल्ह्यात इंजेक्शन शिवाय लोकांचा जीव जात असून अशा काही मेडिकल्स मध्ये व काही लोकांकडे इंजेक्शन चा साठा असल्याने रुग्णांना गरज असल्याने अव्वाच्यासव्वा किमतीत इंजेक्शनची छोट्या पद्धतीने विक्री होत आहे. सदर गोष्टी या सर्वसामान्य नागरिकांना माहिती मिळत असून देखील प्रशासनापर्यंत ही माहिती पोहोचत नाही का? पोहोचत असेल तर अशा हॉस्पिटल्स मेडिकल आणि अशा काही लोकांवर कारवाई का केली जात नाही? असा सवाल आता सर्वसामान्य माणसं करत आहेत..

खान्देश मेडिकक एजन्सी
मालक आशिष अग्रवाल
व ग्राहक महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना दोंडाईचा तालुका संघटक दिग्विजय सिंग राजपूत यांच्यात झालेले संभाषण असे –

दिग्विजय सिंग- हॅलो दादा खानदेश मेडिकल वरून बोलताय

अग्रवाल- हो

दिग्विजय सिंग- दादा रिमडेसिवर इंजेक्शन हवं होत.
आशिष अग्रवाल- कोण बोलतोय?
दिग्विजय सिंग – महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचा दोंडाईचा तालुका संघटक दिग्विजय सिंग राजपूत.

आशिष अग्रवाल- इंजेक्शन कोणाला लागणार आहे पेशंट कुठले आहे?
दिग्विजय सिंग- दोंडाईचा कोविड सेंटर.. हो दादा मला उपलब्ध करून द्या.

आशिष अग्रवाल- सध्या मार्केटमध्ये कुठेही नाही’
दिग्विजय सिंग-अहो दादा मला त्या गौरवने नंबर दिला होता.
एक तरी इंजेक्शन दया दादा..

आशिष अग्रवाल- एक गोष्ट ऐकून घ्या संध्याकाळपर्यंत नंदुरबारहुन लाईन लावली आहे. तुम्ही कागदपत्र तयार तेव्हा संध्याकाळी मला कॉल करा.फोन पे पेमेन्ट करू नका. इंजेक्शन मिळेल तेव्हा कॅश द्या. कोणालाही सांगू नका. तुम्हाला ज्यांनी सांगितलं त्यांनाही कळवू नका. बाहेरून अरेंज केलं असे सांगा.
दिग्विजय सिंग- ओके दादा धन्यवाद आभारी तुमचा.

दिग्विजय सिंग- दादा आलं का इंजेक्शन ?
अग्रवाल-हो आले 2 वाजेला नंदुरबारहून. आता तुम्ही कुठे आहेत?
दिग्विजय सिंग-रामीला. मी निघतोय दोंडाईचाला.

अग्रवाल- ठीक आहे दोंडाईचाला या राम मंदिर माहित आहे का तुम्हाला? तिथे आले का कॉल करा.

दिग्विजय सिंग- दोन इंजेक्शन आहे का? कोणत्या कंपनीचे सिपला का? ओके

दिग्विजय सिंग – दादा कुठे आहेत? मी राम मंदिर जवळ आहे!
आशिष अग्रवाल- ओके पाच दहा मिनिटात आलो …..
आम्ही यांची तक्रार अन्न औषध प्रशासन धुळे विभाग व धुळे जिल्हाधिकारी यांच्या कडे केली आहे तरी कोरोनाच्या काळात काळाबाजार करून सामान्य जनतेची फसवणूक करणाऱ्या वर योग्य ती कारवाई करावी व सामान्य जनतेला न्याय मिळवून द्यावा जेणेकरुन काळाबाजार करणाऱ्यांना कायद्याचा धाक राहील अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण विध्यार्थी सेना न्यायासाठी नियमानुसार तीव्र आंदोलन छेडेल असा इशारा देतो. व परीसरात कुठेही फसवणूक होत असेल तर प्रशासनाला लवकरात लवकर कळवावे असेही आवाहन त्यांनी केले आहे
*धुळे दोडाईचा*
*अख्तर शाह*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *