Entertainment Health Politics Uncategorized

मुख्यमंत्रिपदासह शिवसेनेकडे १५ मंत्रीपदे, उपमुख्यमंत्रिपदासह राष्टÑवादीला १५ मंत्रीपदे, तर काँग्रेसला १२ मंत्रीपदे

मंत्रिमंडळात ‘मेगाभरती’; ३६ जण घेणार शपथ

मुख्यमंत्रिपदासह शिवसेनेकडे १५ मंत्रीपदे, उपमुख्यमंत्रिपदासह राष्टÑवादीला १५ मंत्रीपदे, तर काँग्रेसला १२ मंत्रीपदे

 

Report by : Zubair saifee.

मुंबई : महिनाभरापासून रखडलेल्या राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराचा अखेर मुहूर्त निघाला असून सोमवारी, ३० डिसेंबर रोजी शिवसेनेसह राष्टÑवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे ३६ आमदार मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. विधानभवनाच्या प्रांगणात दुपारी १२ ते १ वाजेच्या सुमारास शपथविधी समारंभ होणार आहे.

२८ नोव्हेंबर रोजी मुख्यमंत्रीउद्धव ठाकरे यांच्यासमवेत सुभाष देसाई, एकनाथ शिंदे, छगन भुजबळ, जयंत पाटील, बाळासाहेब थोरात आणि नितीन राऊत या सहा कॅबिनेट मंत्र्यांनी शपथ घेतली. त्यानंतर हिवाळी अधिवेशनापूर्वी तात्पुरते खाते वाटप करण्यात आले. त्यामुळे मंत्रिमंडळाचा विस्तार कधी, याविषयी उत्सुकता होती. विधानसभा सदस्यांची संख्या २८८ आहे. त्यामुळे जास्तीत जास्त ४३ मंत्री घेतले जाऊ शकतात. सहा मंत्री पूर्वीच आहेत. त्यामुळे आता उर्वरित ३६ मंत्र्यांचा समावेश ३० डिसेंबर रोजी होईल. शिवसेना आणि राष्टÑवादीचे प्रत्येकी १० कॅबिनेट आणि ३ राज्यमंत्री तर काँग्रेसचे ८ कॅबिनेट आणि २ राज्यमंत्री असतील, अशी माहिती सुत्रांनी दिली. सध्या राजभवनातील दरबार हॉलचे काम चालू असल्यामुळे विधानभवनाच्या प्रांगणात शपथविधी होणार असल्याचे राजशिष्टाचार विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले.
खातेवाटपात बदल होणे नाही – राऊत
मंत्रिमंडळाचा विस्तार ३० तारखेला दुपारी बारा ते एक वाजेच्या सुमारास होणार असून, आता त्यात कोणताही बदल होणार नाही. कोणत्याही खात्यासंदर्भात कोणत्याही पक्षाचे घोडे अडलेले नाही. खातेवाटपाचे अधिकार मुख्यमंत्र्यांना आहेत. त्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दोन्ही पक्षांच्या प्रमुख नेत्यांशी चर्चा केली आहे. त्यामुळे कोणा एका पक्षामुळे हा विस्तार रखडला वा खातेवाटपामुळे विलंब होतो, या चर्चेत तथ्य नाही, असे शिवसेना नेते खा. संजय राऊत यांनी नाशिक येथे सांगितले.

अजित पवारांसाठी आमदार आग्रही
मुख्यमंत्रीपदासह शिवसेनेकडे १५ मंत्रीपदे, उपमुख्यमंत्रीपदासह राष्टÑवादीला १५ मंत्रीपदे व विधानसभेचे उपाध्यक्षपद तर काँग्रेसला १२ मंत्रीपदे व विधानसभेचे अध्यक्षपद अशी वाटणी झाली आहे. अजित पवारांनीच उपमुख्यमंत्री व्हावे, असा तरुण आमदारांचा आग्रह आहे. मात्र, अंतिम निर्णय पक्षाध्यक्ष शरद पवार हेच घेतील, असे एका नेत्याने सांगितले.
मंत्रिमंडळातील संभाव्य चेहरे

*शिवसेना*
रविंद्र वायकर, गुलाबराव पाटील, संजय राठोड, तानाजी सावंत, अनिल परब, सुनील राऊत, बच्चू कडू, संजय शिरसाठ, प्रकाश आबिटकर, डॉ. संजय रायमुलकर, श्रीनिवास वनगा, उदय सामंत किंवा भास्कर जाधव, अनिल बाबर किंवा शंभूराज देसाई, नीलम गोºहे

*राष्टÑवादी*
अजित पवार, धनंजय मुंडे,
दिलीप वळसे पाटील,
हसन मुश्रीफ, नवाब मलिक, अनिल देशमुख, राजेंद्र शिंगणे, जितेंद्र आव्हाड, मकरंद पाटील, दिलीप बनकर, अनिल भाईदास पाटील, धर्मराव बाबा आत्राम, आदिती तटकरे, भरत भालके, रोहित पवार, दत्ता भरणे, संजयमामा शिंदे (विधानसभा उपाध्यक्ष:
भारत भालके किंवा राजेश टोपे )

*काँग्रेस*
अशोक चव्हाण, विजय वडेट्टीवार, के. सी. पाडवी, संग्राम थोपटे, अमित देशमुख, यशोमती ठाकूर, सतेज पाटील, विश्वजीत कदम किंवा प्रणिती शिंदे, असलम शेख किंवा अमीन पटेल. (सुनील केदार आणि पृथ्वीराज चव्हाण यांच्याविषयी अनिश्चितता)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *