बारामती पत्रकार संघाच्या तालुकाध्यक्षपदी काशिनाथ पिंगळे यांची निवड वाल्हे प्रतिनिधी-सिकंदर नदाफ
पळशी (ता.बारामती) येथील पत्रकार काशिनाथ आबा पिंगळे यांची भारतीय पत्रकार संघ बारामती तालुक्याच्या अध्यक्षपदी तर उपाध्यक्षपदी विनोद दिलीप गोलांडे यांची निवड करण्यात आली….
केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर जवळपास २० राज्यात कार्यान्वित असणाऱ्या ग्रामीण तसेच शहरी पत्रकारिता जगतातील समस्या व सुमारे 60 हजार पत्रकारांच्या विविध प्रश्नांसाठी कार्य करणारी भारतीय पत्रकार संघाची ओळख आहे. महाराष्ट्रात प्रदेश अध्यक्ष एस.एम.शेख यांच्या मार्गदर्शनाखाली हा संघ कार्यरत असून मुख्य सचिव विवेक देशपांडे व प्रदेश संघटक अनिल सोनवणे यांच्या प्रस्तावानुसार महाराष्ट्राच्या कार्यकारणीत बारामती तालुक्याच्या अध्यक्षपदी काशिनाथ पिंगळे तर उपाध्यक्ष पदी विनोद गोलांडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यावेळी भारतीय पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष ऍड. कैलास पठारे यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीचे पत्र देण्यात आले.
याप्रसंगी पत्रकार संघाचे पुणे शहराध्यक्ष देविदास बिनवडे, पुरंदरचे तालुकाध्यक्ष सिकंदर नदाफ, उपाध्यक्ष रमेश लेंडे यांच्यासह पत्रकार विनोद पवार, विजय गोलांडे, सोमनाथ लोणकर, निखिल नाटकर, बाळासाहेब वाबळे, महमद शेख अविनाश बनसोडे आदी मान्यवर उपस्थित होते.