Crime Entertainment Health International Maharashtra National Politics Social States

भारतीय जनता युवा मोर्चा ने नवी मुंबई वाशी येथील ‘एजंट जॅक्स (AGENT JACK’S)’ या बारचा धक्कादायक प्रकार केला उघड.

भारतीय जनता युवा मोर्चा ने नवी मुंबई वाशी येथील ‘एजंट जॅक्स (AGENT JACK’S)’ या बारचा धक्कादायक प्रकार केला उघड.

नवी_मुंबई:- नवी मुंबई वाशी येथील पाम बीच मॉल मध्ये असलेल्या ‘एजंट जॅक्स (AGENT JACK’S)’ या बार मालकाने बार मध्ये ग्राहकांने दारू पिव्यावी या उद्देशाने त्यांना आकर्षित करण्यासाठी “ALCOHOL KILLS CORONA” अश्या प्रकारचे चुकीचा संदेश देणारे बॅनरबाजी केली होती.

देशात सुरु असलेल्या कोरोना महामारीत लोकांना कोरोना लागणापासून बचाव करण्यासाठीचे निर्देशाबद्दल माहिती न देता, बार मालक हा ग्राहकांना कोरोना या आजाराबद्दल चुकीच्या माहितीचे, दिशाभुल करणारे बॅनर लावून दारू पिण्यासाठी आकर्षित करत होता. एवढंच नव्हे तर बार मध्ये “FOR MALE – NO SHIRT NO SERVICE AND FOR FEMALE – NO SHIRT FREE BEER” असे स्त्रीयांना लज्जा निर्माण होईल अशी अश्लील बॅनरबाजी देखील बार मालकांने बारमध्ये केली होती.

भारतीय जनता युवा मोर्चा नवी मुंबई उपाध्यक्ष, अ‍ॅड.श्री.गणेश रमेश देशमुख व भारतीय जनता युवा मोर्चा ऐरोली महामंत्री, श्री.मयुर प्रकाश ननावरे यांना वरील सर्व प्रकाराबद्दल माहिती मिळताच ‘एजंट जॅक्स (AGENT JACK’S)’ या बारमध्ये जाऊन बार मालक ग्राहकांमध्ये कोरोना संदर्भात करत असलेला चुकीचा प्रसार जनतेच्यासमोर उघड केला. व बार मालकाला हे आक्षेपार्ह बॅनर बाजी काढण्यास भाग पाडले. त्यानंतर बार मालक विरुद्ध वाशी ए.पी.एम.सी पोलीस ठाण्यात व संबंधित सर्व विभागात तक्रार दाखल करण्यात आली. तरी सर्व जनतेस विनंती आहे की, या कोरोना महामारीच्या काळात जर अश्या प्रकारे कोणीदेखील कोरोना आजाराबद्दल चुकीची माहिती प्रसारित करत लोकांचा जीव धोक्यात घालून स्वतःचा फायदा बघून व्यवसाय करत असेल तर आपण त्वरित अश्या लोकांना विरुद्ध तक्रार करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *