Crime Health International Maharashtra National Social States Uncategorized

पुलिस नाईक मुरलीधर सपकाळे यांची उत्तम कामगिरी पिस्तूल बाळगणाऱ्या महिला गजाआड

पुलिस नाईक मुरलीधर सपकाळे यांची उत्तम कामगिरी
पिस्तूल बाळगणाऱ्या महिला गजाआड

पिस्तूल बाळगणाऱ्या एका महिलेला गजाआड करण्यात आले ही उत्तम कामगिरी पोलीस नाईक मुरलीधर सपकाळे यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे मुंबई गुन्हे प्रकटीकरण शाखा कक्ष ७ च्या पथकाने केली या कारवाईत महिलेकडून पिस्तूल जप्त करण्यात आले आहे। सदर पिस्तूल परिचयाच्या इसमाने पूर्ववैमनस्यातून एकाला जिवे मारण्यासाठी आणले असून महिलेकडे ठेवण्यासाठी दिले होते अशी माहिती कक्ष ७ च्या पथकाने दिली।
मुंबई गुन्हे प्रकटीकरण शाखा कक्ष ७ च्या पथकाने दिलेल्या माहितीनुसार अवैध धंदे, गुन्हे प्रवृत्तींच्या सराईत इसमांवर लक्ष ठेवून असताना मुंबई गुन्हे प्रकटीकरण शाखा कक्ष ७ च्या पथकातील पोलीस नाईक मुरलीधर सपकाळे यांना खबऱ्याने पिस्तूल बाळगणाऱ्या महिलेची माहिती दिली त्या माहितीच्या आधारे कक्ष ७ च्या पथकाने कुर्ला पश्चिम परिसरातील सुंदरबाग फिनिक्स मॉलजवळ सापळा लावला मिळालेल्या माहितीनुसार बुरखा परिधान केलेली एक महिला तेथे आली तिच्या संशयास्पद हालचालींवरून महिला अंमलदाराने बुरखाधारी महिलेला ताब्यात घेतले। तिची चौकशी केली असता तिने स्वत:चे नाव सीमा मो.फैजल खान (३४) असे सांगितले सीमाच्या हातातील प्लॅस्टिकच्या पिशवीची झडती घेतली असता त्यात कपड्यात गुंडाळलेले पिस्तूल आढळून आले।सदर पिस्तूलबाबत चौकशी केली असता सीमाच्या परिचयाच्या इसमाने ठेवण्यासाठी दिले होते।
त्या इसमाचे बाबा रहीम नावाच्या इसमासोबत पूर्वी भांडण झाले होते. त्या भांडणाचा वचपा काढण्यासाठी पिस्तूल आणल्याचे सीमाने चौकशीदरम्यान कक्ष ७ च्या पथकाला सांगितले।


बेकायदेशीररीत्या पिस्तूल बाळगल्या प्रकरणी घाटकोपर पोलीस ठाण्यात (गु. र. क्र. १११/२०२०) भारतीय हत्यार कायदा कलम ३, २५ सह महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७(१)(अ), १३५ नुसार गुन्हा दाखल करून महिलेला अटक करण्यात आली।
ही उत्तम कारवाई सह पोलीस आयुक्त (गुन्हे) मिलिंद भारंबे, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) एस. विरेश प्रभू, गुन्हे प्रकटीकरण १ चे उपायुक्त अकबर पठाण, सहाय्यक पोलीस आयुक्त (डी-पूर्व) अविनाश शिंगटे, गुन्हे शाख कक्ष ७ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश देसाई, पोलीस निरीक्षक मनीष श्रीधनकर यांच्यामार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष मस्तुद, महिला हवालदार स्नेहा नाईक, महिला पोलीस नाईक सरिता शिंदे, पोलीस नाईक मुरलीधर सपकाळे, पोलीस नाईक नागनाथ जाधव, पोलीस शिपाई गणेश पाटील आदी पथकाने केली।

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *