बालदिनी भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल फेसबूकवर अपमानकारक टिप्पणी
अनिल सकपाळ – सध्या दीपावली उत्सव साजरा होत आहे , कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर आतापर्यंत झालेले नुकसान है सर्वश्रुत आहे , मग ते व्यक्तिगत पातळीवर असो वा शासन पातळीवर,सर्वच जण या दिव्यांच्या उत्सवात आपले दुःख विसरून एक नवी भरारी घेण्याच्या प्रयत्नात असताना काही समाजकंटक मात्र भारतात होवून गेलेल्या थोर महापुरुषांचा अपमान करताना दिसत आहेत,आजच देशातील सर्व मंदिरे खुली होणार असा उद्धव ठाकरे सरकार च्या वतीने निर्णय आला आहे त्यातच अशी अपमानकारक टिप्पणी करून दोन धर्मात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे,
फेसबूकवरिल “एक करोड़ हिंदूंचा फेसबुक ग्रुप जो हिंदू एड़ होईल त्याने १०० हिंदू एड करावे” नामक या ग्रूपवर नम्रता कोलंबकर नावाच्या फेसबुक आई डी वरून भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल अवमानकारक टिप्पणी केल्यामुळे डॉ बाबासाहेब यांना मानणाऱ्या वर्गात असंतोषाचे वातावरण निर्माण झाले असून लवकरच या फेसबुक आई डी वर कायदेशीर कार्रवाई करण्याची मागणी मुंबई सायबर क्राइम पोलिसांकडे केली आहे.