पाडळी येथे संविधान दिवस आनंदात साजरा
प्रतिनिधी वजीर शेख
आज दि.26 नोव्हेंबर 2020 पाडळी ग्रामपंचायत मध्ये संविधान दिनानिमित्त भारतीय संविधानाच्या उद्देशपत्रिकेचे वाचन करण्यात आले डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्क्रमास सुरवात झाली. यावेळी युवा नेते संजय कांबळे यांनी मनोगत व्यक्त केले तें म्हणाले की डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी एका लेखणीच्या माध्यमातुन पाच हजार वर्षापासुन गुलामगिरीत खितपत पडलेले जनतेला न्याय मिळवुन दिला ही शक्ती लेखणीत आहे म्हणजे विद्वतेत आहे येथील मनुवादी व्यवस्थेला दफन करून भारतीय संविधानाची निर्मिती केली आज त्याच संविधानावर संपूर्ण भारत देश टिकून आहे. “लेखणी ही एक समाजक्रांतीचे व समाजपरिवर्तनाचे शस्र आहे.त्याचबरोबर डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी स्रियांच्या उद्धारासाठी देखिल मोलाचे योगदान दिले आहे त्यामुळे आज महिला या उच्चपदस्थ अधीकारी आहेत आगामी काळामध्ये आपल्याला भारतीय संविधानाचा जागर करावा लागेल व प्रत्येकाच्या घराघरात भारतीय संविधान पोहचवावे लागेल असे प्रतिपादन केले व तरुणांनी भारतीय संविधानाचा अभ्यास करावा असे आव्हाण केले. कार्यक्रमाचे आध्यक्ष विद्यमान सरपंच बाजीराव गर्जे यांनी प्रत्येक तरुणांनी बाबासाहेब आंबेडकर यांना आदर्श मानुन शिक्षण घेतले पाहिजे असे मत व्यक्त केले त्याचबरोबर पाडळी गावामध्ये लोकशाही मार्गानेच करभार करत आहोत एखाद्याच्या दुःखात सहभागी होणे ही मूल्य संविधानानेच माझ्यामध्ये रुजवली आहेत प्रतिकुल अवस्थेमध्ये मि जेंव्हा संघर्ष करतो तेंव्हा बाबासाहेब आंबेडकर यांनाच मि माझे प्रेरणास्थान मानतो असे प्रतिपादन त्यांनी यावेळेस केले. युवा नेते सुहास कांबळे, व अंगणवाडी ताई अनिता कांबळे यांच्या हस्ते विद्यमान सरपंच बाजीराव गर्जे व ग्रामसेवक मॅडम यांना समाज क्रांतीचे शस्र *लेखणी* ही भेटवस्तु देण्यात आली.
पाडळी गावच्या ग्रामसेवक मॅडम यांनी कर्यक्रमाचे आभार प्रदर्शन केले यावेळी सुहास दादा कांबळे, अमोल ढगे, आनंद कांबळे, जय कांबळे, गणेश साळुंके, विशाल कांबळे (मेजर ),संदीप कांबळे, सुशील ढगे ग्रामपंचायत शिपाई बाबासाहेब सांगळे उपस्थित होते.