International Maharashtra National Politics Social States Uncategorized

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे बुलढाणा जिल्हा अध्यक्ष ॲड नझेरे काझी यांचा वाढदिवस मूकबधिर,बेघर,अनाथ सोबत कुठलाही गाज्या वाज्या ना करता साजरा.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे बुलढाणा जिल्हा अध्यक्ष ॲड नझेरे काझी यांचा वाढदिवस मूकबधिर,बेघर,अनाथ सोबत कुठलाही गाज्या वाज्या ना करता साजरा.

मुंबई सिद्धार्थ काळे

बुलडाणा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अडव्हकेट मा.नाझेर काझी साहेब यांचा
1 डिसेंबर रोजी संपन्न झाला मंगलमय वाढदिवस, पळसखेड सपकाळच्या सेवासंकल्पातील मतिमंद, मुकबधीर, मनोरुग्णयांच्या सहवासात सजरा झाला, पालवे दाम्पत्याने काळजाशी मायेने आवळलेली ही बेसाहारा मंडळी, कोण कुठून आला, कुठल्या जातीचा, कोणत्या धर्माचा काहीच पत्ता नाही, इथे फक्त चहुदिशेने लाटाळून येणारी फक्त माणुसकी, परिवाराने, गणगोताने रस्त्यावर आणून सोडलेल्याना दोनवेळ घास भरवण्याची काळजी, पालवे दाम्पत्याने या काळजीला आपले अख्खे आयुष्य समर्पित केले, पोक्त वयात काही माणसे प्रमार्थाकडे, समाजकारणाकडे वळली तर नवल वाटत नाही पण ऐन तारुण्यात आपल्या जोडीदारासोबत गुलाबी स्वप्ने रंगवण्याच्या इंद्रगोपी काळात पालवे श्री नंदुभाऊ पालवे आणि सौ.आरती पालवे यांनी थाटला हा परोपकारी प्रपंच, पालवे दाम्पत्याचा दिवस अनाथ, अपंग,मनोरुग्णाच्या सरबराईत उगवतो आणि सरबराईतच मावळतो, काझी साहेबांच्या वाढदिवसानिमित्त या बेसाहारा मंडळीच्या तोंडात गोडधोड पडावं, वाढदिवसाच्या जाहिरातीवर, तामझामवर खर्च न करता ती रक्कम या वशिलाहीनांच्या पंगतीसाठी सत्कारणी लागावी अशी काझी साहेबांच्या सहचारणी सौ हाजरा नुजहत यांची कनवाळू संकल्पना, पंगत बसली, मंडळी आनंदाने जेवू लागली, काझी साहेबांच्या पापण्या आनंदाश्रुंनी ओलावल्या,
पालवे दाम्पत्याविषयीच्या शब्दातीत भावना काझी साहेबांच्या चेहऱ्यावर तरळल्या, तब्बल 4 तास थांबून सेवा संकल्प प्रतिष्ठानची परिपूर्ण माहिती घेऊन येणाऱ्या काळात कशी भरीव मदत देता येईल याचे कृतिशील आश्वासन यावेळी काझी साहेबांनी वाढदिवसाच्या दिनी दिले. यावेळी सौ हाजरा काझी मॅडम, नामवंत निवेदक प्रसिध्द कवी अजीम नवाज राही साहेब, पालकमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे साहेब यांचे स्वीय सहाय्यक संभाजी पेटकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे चिखली तालुका अध्यक्ष गजानन वायाळ, राष्ट्रवादी युवक जिल्हा अध्यक्ष शेखर बोन्द्रे, राष्ट्रवादी विद्यार्थी जिल्हा अध्यक्ष संदिप मेहेत्रे, राष्ट्रवादी युवक शहर अध्यक्ष शेख याशीन हे उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *