मोनिका शिपीं यांना सामाजिक क्षेत्रातील सेवा गौरव पुरस्कार जाहीर
सु-लक्ष्मी बहुद्देशिय सेवाभावी संस्था औरंगाबाद व माणुसकी रुग्णसेवा समुह शासकीय रुग्णालय घाटी यांच्या संयुक्त विद्यमाने चौथ्या वर्धापन दिनानिमित्त मोनिका शिंपी यांना सेवा गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
हा पुरस्कार सोहळा दि. ३०-१२-२०२० बुधवार रोजी पार पडणार असून या पुरस्कार वितरण
*मौलाना आझाद संशोधन केंद्र, टीव्ही सेंटर औरंगाबाद* येथे संपन्न होणार आहे.
वर्धापन दिन कार्यक्रमाची रूपरेषा
– दुपारी १०:०० वाजता महारक्तदान शिबीर
– ०१:०० वा. मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.समाजातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ४१ व्यक्तीचां गुण गौरव या कार्यक्रमात करण्यात येणार आहे. त्यापैकी शिंपी ताई यांचा परिचय असा आहे.नावः मोनिका अशोक शिंपी समाजसेविका
पत्ता आकाशवाणी केद्राच्या पाठिमागे देवपुर धुळे,
कार्य :- मुक्ता आदिवासी महिला बहुउद्देशिय संस्था,धुळे यांच्या वतीने दिवाळीचे फराळ वाटप.. आदिवाशि वस्तीवरील गोरगरिबांना रोख रक्कम पण देण्यात आली.संस्थेचे अध्यक्ष मोनिका शिंपी, यांच्या सहकार्याने दिवाळी तुमची- आमची दिवाळी म्हणजे सण उत्साहाचा,सण दिव्यांचा,सण आनंदाचा,सण सगळ्यांनी एकत्र येण्याचा दिवाळी उपक्रम तसेच अनेक सामाजिक कार्यात त्या अग्रेसर आहे महिलांचे प्रश्न असतील तसेच रक्तदान शीबिराची जनजागृती असेल अश्या अनेक सामाजिक कार्यातुन- मुक्ता आदिवासी महिला बहूउद्देशीय संस्थेच्या माध्यमातून कार्य अविरत पने चालु आहे.त्याच्या या सामाजिक चळवळीची अनेक दैनिक रेडिओ मुलाखत आली आहे.या समाजसेवि वृत्तीला माणुसकी समुहाचा सेवा गौरव पुरस्कार निवड झाल्या बाबत पत्राद्वारे संस्थापक अध्यक्ष समाजसेवक सुमित पंडित यानी कळविले आहे.ह्या पुरस्काराबद्दल मोनिका शिंपी यांचे समाजामध्ये सर्वेत्र कौतुक केले जात आहे.