Education Entertainment Health International Maharashtra National Social States Uncategorized

राज्यस्तरीय पुरस्काराने पाथर्डीच्या सौरभ केदारचा नाशिक येथे सन्मान

राज्यस्तरीय पुरस्काराने पाथर्डीच्या सौरभ केदारचा नाशिक येथे सन्मान

प्रतिनिधी वजीर शेख

महाराष्ट्रातील अनेक कृषी क्षेत्रातील उल्लेखनीय काम करणारे कृषी प्राध्यापक, विचारवंत, संशोधक, कृषिवेत्ते, कृषी उद्योजक, हे सर्व कृषी अभ्यासाबरोबर कृषी विस्तारासह, कृषी संशोधनांचे कार्य करत उद्याचे कृषिप्रधान देशाचे तरुण घडवत असतात अशा मान्यवरांच्या कार्याची दखल घेत त्यांच्या कार्याला सलामी देण्यासाठी महाराष्ट्रातील सर्वात मोठा व सन्मानाचा विशेष राज्यस्तरीय ऍग्रोकेअर आयडॉल पुरस्कार २०२० नुकताच ५डिसेंबर २०२० ला हॉटेल पंचवड प्राईड, नाशिक येथे अनेक दिग्गज मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
पाथर्डी येथील सौरभ सुभाष केदार ह्याने कृषी संशोधन क्षेत्रातील विशेष कामगिरीने नुकतीच विश्वविक्रमाला गवसणी घातली आहे. त्याने शेतकऱ्यांसाठी आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरण्यासाठी लिहिलेले कृषी विषयक लेख, साहित्य, संशोधन आणि कृषी क्षेत्रातील कार्याची दखल घेत स्व. वसंतराव नाईक कृषी प्रेरणा पुरस्कार-२०२० नुकताच कळवण,नाशिक आमदार नितीनभाऊ पवार, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ, नाशिकचे संचालक डॉ. सूर्या गुंजाळ, आत्माचे प्रकल्प संचालक श्री. राजेंद्र निकम, माझ्या नवऱ्याची बायको फेम सिने अभिनेत्री स्मिता प्रभू यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र, सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले..
सौरभच्या कृषी क्षेत्रातील नेत्रदीपक कामगिरीबद्दल डॉ. जे. जे. हॉस्पिटलचे अधिष्ठाता पद्मभूषण डॉ. तात्याराव लहाने, जिल्हा परिषद, अहमदनगरच्या अध्यक्षा सौ. राजश्री घुले पाटील,पाथर्डी शेवगाव मतदार संघाचे माजी आमदार श्री. चंद्रशेखर घुले पाटील, पंचायत समिती पाथर्डीचे माजी सभापती संभाजी पालवे यांच्यासह अनेक प्रतिष्टीत मान्यवरांनी सौरभच्या कार्याबद्दल कौतुक केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *