Education Entertainment Health International Maharashtra National Social States

दादा पाटील राजळे महाविद्यालयात स्व.राजीवजी राजळे यांची ५१वी जयंती साजरी..

दादा पाटील राजळे महाविद्यालयात स्व.राजीवजी राजळे यांची ५१वी जयंती साजरी..

प्रतिनिधी वजीर शेख

पाथर्डी तालुक्यातील आदिनाथनगर येथे नुकताच स्वर्गीय आमदार राजीवजी राजळे यांच्या 51 व्या जयंतीनिमित्त अर्थशास्त्र विभागातील पदव्युत्तर विभागात गुणवत्ता यादीत प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या श्रीमती खांडेभराड स्वाती गणेश आणि बी.ए.अर्थशास्त्र विभागात गुणवत्ता यादीत प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेली कुमारी दारकुंडे भारती गोवर्धन यांचा पालकांसह सत्कार करण्यात आला. या सत्कारानंतर विभागातील गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक करताना संस्थेचे उपाध्यक्ष माननीय श्री रामकिसन पाटील काकडे तसेच मार्गदर्शक तसेच जिल्हा परिषद सदस्य मा. श्री राहुलजी राजळे , ज्येष्ठ संचालक मा. श्री सुभाषराव ताठे पाटील ,शिक्षण संस्थेचे सचिव मा. श्री जे.आर. पवार, ह.भ. प.श्री काळे महाराज ,श्री सुपेकर सर, पाथर्डी नगरपालिकेचे नगरसेवक मा.श्री प्रवीण राजगुरू, मा. श्री अनिल बोरुडे, डॉ. अण्णासाहेब शिंदे कृषी तंत्रनिकेतन विद्यालयाचे प्राचार्य डॉ. सूर्यवंशी वाय.बी. ,आदिनाथ कृषी विकास प्रतिष्ठानचे सचिव मा. श्री भास्करराव गोरे, अर्थशास्त्र पदवी व पदव्युत्तर विभाग व वाणिज्य शाखा प्रमुख प्रा.डॉ. सुभाष ज. देशमुख डॉ. नितीन भिसे, डॉ.भाऊसाहेब जगताप, प्रा. देविदास खेडेकर ,प्राध्यापिका श्रीमती कविता वीर, प्राध्यापिका श्रीमती अर्चना नवले आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *