Crime Entertainment Health International Maharashtra National Politics Social States Uncategorized

मुंबई भाजप नगरसेविका सुरेखा पाटील यांनी महापरिनिर्वाण दिनी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची फेसबुक पेज वरून केली विटंबना.

मुंबई भाजप नगरसेविका सुरेखा पाटील यांनी महापरिनिर्वाण दिनी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची फेसबुक पेज वरून केली विटंबना.

विविध संघटनेने पुढाकार घेत समता नगर पोलीस ठाणे मध्ये गुन्हा दाखल..

मुंबई(सिद्धार्थ काळे)

दिनांक ६/१२/२०२० रविवार दुपारी १:३० वाजता वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते गंगाराम रमेश खैरे यांनी त्यांच्या फेसबुक अकाउंट राम खैरे (https://www.fecbook.com/ram.khaire.94) मध्ये बृहन्मुंबई महानगर पालिकेच्या वार्ड क्रमांक 27 च्या भारतीय जनता पार्टीच्या विद्यमान नगरसेविका श्रीमती सुरेखा मनोज कुमार पाटील यांनी त्यांच्या अधिकृत फेसबुक पेजवर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विडंबनात्मक मॉर्फ केलेले छायाचित्र अपलोड केली आहे असे कळल्यावर त्यावरून वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते अंकुश जाधव यांनी त्यांच्या फेसबूक अकाउंट वरून (https://www. Facebook.com/ankush.jadhav.7505468) वर जाऊन श्रीमती सुरेखा पाटील यांच्या सुरेखा पाटील कार्पोरेटर ( https://www.facebook.com/profile.php?id=100015161261793) या फेसबुक पेजवर जाऊन पाहिले असता अंकुश जाधव यांनी बघितले महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बृहन्मुंबई महानगरपालिका रुग्णालय कांदिवली पश्चिम मुंबई या ठिकाणी आयोजित अभिवादन च्या कार्यक्रमांमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या रंगीत प्रतिमेस नगरसेविका सुरेखा पाटील या अभिवादन करीत असताना चे एकूण चार छायाचित्रे अपलोड केल्याचे दिसून आले आहे. त्या ठिकाणी पाहिले असता सदर चार छायाचित्र पैकी एका छायाचित्रांमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याजवळ नगरसेविका सुरेखा पाटील या उभ्या असल्याचे व सदर पूर्णाकृती पुतळ्याच्या सुशोभित टेबलावर ठेवलेल्या वरील नमूद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या रंगीत प्रतिमेस लहान मुले डोक्यात लावण्याकरिता वापरत असलेल्या सशाच्या कानासारखे पिवळ्या रंगाचे हेअर बँड डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कपाळास लावल्याचे मॉर्फ केलेले छायाचित्र अपलोड केल्याचे दिसून आले अशाप्रकारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अपमान होईल असे छायाचित्र अपलोड केल्याने सदर दलित-बहुजन भारतीय जनतेच्या भावना दुखावल्या गेल्या श्रीमती सुरेखा पाटील या मनपाच्या विद्यमान नगरसेवक असल्याने त्यांच्या फेसबुक पेज द्वारे सोशल मीडियाच्या माध्यमातून पूर्ण मुंबई महाराष्ट्र भारत देशभर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रति परमपूज्य विश्वरत्न महामानव भारतीय घटनेचे शिल्पकार बोधिसत्व राष्ट्रपुरुष कायदेपंडित डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रती आदरयुक्त भावना मनी बाळगणाऱ्या लाखो-करोडो अनुयाच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या आहेत त्यामुळे नगरसेविका सौ सुरेखा पाटील यांच्या सदरच्या कृतीमुळे सर्व आंबेडकरी अनुयायी यांनी सदर बाबत तक्रार समता नगर पोलीस ठाणे मध्ये 295 ( अ) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला यावेळी समता नगर पोलीस ठाणे मध्ये विविध संघटना विविध पक्ष चे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उत्तर मुंबई युवक जिल्हाध्यक्ष किरण मोरे, राष्ट्रवादी मागाठाणे तालुकाध्यक्ष काशिनाथ नरवाडे, जिल्हा महासचिव वंदना मस्के, वंचित बहुजन आघाडीचे अंकुश जाधव, राम खैरे, वंचित बहुजन कांदिवली तालुकाध्यक्ष सिद्धार्थ शिरसाट, बहुजन समाज पार्टीचे तालुकाध्यक्ष एडवोकेट विजय सोनवणे, अनिल म्हस्के, आरपीआयचे संजय बोर्डे पत्रकार, सागर खरात, अमय काळे, विशाल चव्हाण इत्यादी शेकडो अनुयायी समता नगर पोलीस स्टेशन याठिकाणी एकवटला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *