भारतीय पत्रकार संघ एआयजे आणि फाईट अगेन्स्ट क्रिमिनल या सुप्रसिद्ध वृत्तपत्राचे मुंबई कार्यालयाचा, भव्य उद् घाटन सोहळा नुकताच लोखंडवाला, अंधेरी
येथे संपन्न झाला.याप्रसंगी माजी गृहमंत्री कृपाशंकर सिंह,केंद्रीयमंत्री रामदास आठवले, स्थानीय नगरसेवक राजूभाऊ पेडणेकर, एआयजे राष्ट्रीय अध्यक्ष विक्रम सेन यांचे हस्ते फीत कापून उदघाटन करण्यात आले.
यावेळी धडक कामगार युनियनचे नेते अभिजित राणे, खेडकरजी, डॉ.राव, जोगेश्वरी युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष उपेंद्र एम.पांडे,भारतीय पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष मो.सईद शेख,पो.निरीक्षक इरफान शेख, अनिल सोनवणे,शिवसेना युवा शाखा उपप्रमुख विनोद गिरी,मुगिश खान आणि महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी चे पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे यशस्वी सूत्रसंचलन प्रदेश उपाध्यक्ष गोपाल मारवाडी यांनी केले. याप्रसंगी पुणे, औरंगाबाद, धुळे, मुंबई, नाशिकसह सर्व जिल्ह्यातील भारतीय पत्रकार संघाचे पदाधिकारी उपस्थित होते.
धुळे-नंदुरबार विधानपरिषदेचे नवनिर्वाचित आमदार अमरीशभाई पटेल यांनी एआयजे कार्यालय उद् घाटन कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या.
शिरपूर(धुळे) येथील राजेश मारवाडी, युवराज माळी, विश्वास (मंगेश) माळी यासह मोठया संख्येने भारतीय पत्रकार संघाचे पदाधिकारी हजर होते.कार्यक्रम यशस्विते करिता प्रदेश उपाध्यक्ष शफीकभाई शेख ,विनोद गिरी, आहिल शेख यासह वात्सल्य न्यूज व अटल सुरक्षा न्यूज चे मॅनेजिंग डायरेक्टर शोएब म्यानूर इ.नी परिश्रम घेतले.
अंधेरी वेस्ट, मुंबई येथील लोखंडवाला क्रिस्टल टॉवरमध्ये नव्याने सुरु झालेल्या कार्यालयात पत्रकार बंधू-भगिनींना सोयीचे होईल अशी भावना मान्यवरानी व्यक्त केली. शेवटी आभार प्रदर्शन मो. सईद शेख यांनी केले.स्नेहभोजनाने कार्यक्रमाची यशस्वी सांगता झाली.