Education Entertainment Health International Maharashtra National Politics Social States Uncategorized

ग्राहक पंचायत महाराष्ट्र , नाशिक जिल्हा तर्फे ग्राहक दिन उत्साहात साजरा, माहिती व कार्य दिशा या पुस्तकाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन व वितरण

ग्राहक पंचायत महाराष्ट्र , नाशिक जिल्हा तर्फे ग्राहक दिन उत्साहात साजरा, माहिती व कार्य दिशा या पुस्तकाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन व वितरण

नाशिक रविंद्र नेरकर
नाशिक – ग्राहक पंचायत महाराष्ट्र, नाशिक जिल्हा व नाशिक महानगर तर्फे दरवर्षी प्रमाणे यावर्षीही २४ डिसेंबर राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी नाशिक जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाचे अध्यक्ष श्री. मिलिंद सोनवणे, जिल्हा पुरवठा अधिकारी श्री. अरविंद नारसिकर, जिल्हा परिषद अधिकारी श्री जगताप , सेवानिवृत्त बँक अधिकारी श्री रवींद्र मोडक, नाशिक विभाग सह संघटक ॲड. सुरेंद्र सोनवणे, जिल्हा अध्यक्ष श्री सुधीर काटकर, जिल्हा संघटक श्री दत्ताजी शेळके यांच्या यांच्या हस्ते प्रतिमापूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले.
यावेळी नाशिक विभाग सहसंघटक ॲड. सुरेंद्र सोनवणे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करून ग्राहक दिनाचे महत्त्व, नवीन ग्राहक संरक्षण कायद्याच्या महत्त्वाच्या तरतुदी व कायद्यातील बदलांबद्दल माहिती दिली.
नाशिक जिल्हा अध्यक्ष श्री सुधीरजी काटकर यांनी ग्राहक पंचायत महाराष्ट्रचा इतिहास उद्देश व कार्याबाबत माहिती देऊन ग्राहक जागृती अभियान बाबत सविस्तर माहिती दिली .
यावेळी ग्राहक पंचायत महाराष्ट्र च्या माहिती व कार्यपुस्तिकेचे वितरण जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाचे अध्यक्ष श्री. मिलिंद सोनवणे, व जिल्हा पुरवठा अधिकारी श्री. अरविंद नारसिकर यांचे हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले.
या कार्यक्रमात ग्राहक पंचायत महाराष्ट्र च्या माहिती व कार्य दिशा या पुस्तकाचे प्रकाशन व वितरण करताना नाशिक जिल्हा पुरवठा अधिकारी माननीय श्री अरविंद नरसीकर साहेब यांनी आपले मनोगत व्यक्त करताना ही माहिती पुस्तिका म्हणजे ग्राहक व कार्यकर्ते साठी उपयुक्त आहे. तसेच ग्राहक संरक्षण कायदा २०१९ हा ग्राहकांसाठी फायदेशीर असून या कायद्याने ग्राहकांच्या संरक्षणात वाढ झाली आहे असे सांगितले व यावर्षी ग्राहक संरक्षण कायद्याचा उद्देश सर्वसामान्य ग्राहकां पर्यंत पोहोचवण्यासाठी प्रशासन प्रयत्न करणार आहे असे सांगितले
नाशिक जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच अध्यक्ष श्री मिलिंद सोनवणे साहेब यांनी नवीन ग्राहक संरक्षण कायदा हा ग्राहकांना न्याय देणारा आहे व ग्राहकांचे हित जोपासणारा असून या नवीन कायद्यामुळे ऑनलाइन पद्धतीने होणाऱ्या फसवणुकीवर आळा बसणार आहे. असे सांगितले. तसेच ग्राहक पंचायत महाराष्ट्र चे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या कार्य करण्याची पद्धत अतिशय शांत व शिस्तबद्ध पद्धतीने आहे. असे सांगून ग्राहकाने त्याच्या अधिकारा बाबत सतत जागरूक असायला हवे असे सांगितले.
जिल्हा परिषद चे प्रशासकीय अधिकारी श्री जगताप साहेब यांनी ग्राहक पंचायत महाराष्ट्राच्या कार्यास शुभेच्छा सदैव ग्राहकाभिमुख सेवा देण्यास तत्पर असल्याबाबत सांगितले.


बँक ऑफ महाराष्ट्र चे माजी अधिकारी श्री. रवींद्र मोडक यांनी त्यांच्या जीवनातील विविध अनुभव कथन करून ग्राहकांच्या होणाऱ्या वेगवेगळ्या फसवणुकीबद्दल माहिती दिली.
जिल्हा संघटक दत्ताजी शेळके यांनी ग्राहक कीर्तन माननीय बिंदुमाधव जोशी यांच्या कार्याचा गौरव करून ग्राहक पंचायत महाराष्ट्राची जडणघडण व वाटचालीबाबत माहिती दिली व ग्राहकांना त्यांना त्यांची फसवणूक होऊ नये यासाठी ग्राहक पंचायतीचे कार्यकर्ते सतत आपल्याला मार्गदर्शन करतील असे सामान ज्या आपल्या ग्राहकांची फसवणूक झाली असेल त्यांनी ग्राहक पंचायतीच्या पदाधिकाऱ्यांकडे संपर्क साधावा असे आवाहन केले,

यावेळी नाशिक विभाग सह संघटक ॲड. सुरेंद्र सोनवणे, जिल्हा अध्यक्ष श्री सुधीर काटकर, जिल्हा संघटक श्री दत्ताजी शेळके, महिला आघाडी प्रमुख शशिकला धारणकर , कोषाध्यक्ष श्री. उल्हास शिरसाट, नाशिक महानगर सह संघटक श्री प्रकाश जोशी, नाशिक महानगर संघटक प्रशांत देशमुख, सहसचिव संदीप नगरकर आदी यावेळी उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिल्हाध्यक्ष श्री सुनील काटकर यांनी केले व आभार प्रदर्शन श्री प्रशांत देशमुख यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *