Bihar Cricket Crime Delhi Education Entertainment Gujarat Health International Madhya Pradesh Maharashtra National Politics Social States Uncategorized Uttar Pradesh West Bengal

गुन्हे प्रकटीकरण शाखा 10 यांची धडाकेबाज कारवाई। गुजरात व मुंबईत सशस्त्र दरोडा, खंडणीच्या गुन्ह्यात फरार असलेला आरोपीला गजाआड। सहायक पुलिस निरीक्षक वाहिद पठान यांची उत्तम धड़ाकेबाज़ कामगिरी।

गुन्हे प्रकटीकरण शाखा 10 यांची धडाकेबाज कारवाई।
गुजरात व मुंबईत सशस्त्र दरोडा, खंडणीच्या गुन्ह्यात फरार असलेला आरोपीला गजाआड।
सहायक पुलिस निरीक्षक वाहिद पठान यांची उत्तम धड़ाकेबाज़ कामगिरी।

मनोज दुबे

गुजरातमध्ये दिवसाढवळ्या गोळीबार करून दरोडा तर मुंबईत बांधकाम व्यावसायिकाला खंडणीसाठी धमकावल्याच्या गुन्ह्यांमध्ये फरार असलेल्या सराईत आरोपीला गजाआड करण्यात आले आहे। ही धडाकेबाज कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक वाहिद पठाण यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे मुंबई गुन्हे प्रकटीकरण शाखा कक्ष १० च्या पथकाने केली।या आरोपीला पुढील कारवाईसाठी दिंडोशी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे, अशी माहिती कक्ष १० च्या पथकाने दिली।
मिळालेल्या माहितीनुसार, १३ आॅगस्ट २०१९ रोजी गुजरात राज्यातील पाटण जिल्ह्यात १४ जणांच्या टोळक्याने भरदिवसा एका अंगडियाचे हिरे व रोकड असा एकूण ६ लाख ६४ हजार रुपयांचा मुद्देमाल लुटला।सदर लुटमारीच्या वेळी पाटण सीटी बी डिव्हीजन पोलिसांनी दरोडेखोरांना रोखण्यासाठी प्रयत्न केला असता दरोडेखोरांनी पोलिसांवर गोळ्या झाडल्या या गोळीबाराला प्रतिउत्तर देताना पोलिसांनीही दरोडेखोरांवर गोळ्या झाडल्या। त्यावेळी संधी साधून दरोडेखोरांनी पळ काढला या प्रकरणी गुजरातमधील स्थानिक पाटण सीटी बी डिव्हीजन पोलीस ठाण्यात (गु.र.क्र. ८३/२०१९) भादंवि कलम ३९४, ३९७, ३०७, ३५३ १२०(ब) सह भारतीय हत्यारबंदी कायदा कलम ३, २५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला।
दरम्यानच्या काळात मुंबई गुन्हे प्रकटीकरण शाखा कक्ष १० च्या पथकाने अंगडियाला लुटणाºया टोळीतील एका दरोडेखोºयाच्या २९ आॅगस्ट २०१९ रोजी मुंबईत मुसक्या आवळल्या। या आरोपीला रीतसर गुजरातमधील पाटण सीटी बी डिव्हीजन पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. मात्र या गुन्ह्यात सहभागी असलेला शार्प शूटर अब्दुल वाहब रसिदमिया सय्यद (४३) हा फरार होता। सदर आरोपी ओळख लपवून पालघर जिल्ह्यात राहत असल्याची माहिती गुन्हे शाखा कक्ष १० च्या पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक वाहिद पठाण यांना मिळाली त्या माहितीच्या आधारे कक्ष १० च्या पथकाने पालघर जिल्ह्यातील नालासोपारा परिसरात सापळा लावून अब्दुल वाहब रसिदमिया सय्यद याच्या मुसक्या आवळल्या सय्यद याची कसून चौकशी केली असता त्याने मुंबईतील एका बांधकाम व्यावसायिकाला खंडणीसाठी धमकावल्याचे निष्पन्न झाले. सय्यद हाती लागल्याने दिंडोशी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या (गु.र.क्र. १५७/२०१९ भादंवि कलम ३८४, ३२४, ५०६(२), ३४) गुन्ह्याची उकल झाली आहे. तसेच कुरार पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या (गु.र.क्र. १७८/२००२) गुन्ह्यात सय्यद याला शिक्षा सुनावण्यात आल्याचेही तपासादरम्यान उघडकीस आले आहे, अशी माहिती कक्ष १० च्या पथकाने दिली।
ही धडाकेबाज कारवाई मुंबई पोलीस दलाचे सह पोलीस आयुक्त (गुन्हे) मिलिंद भारंबे, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) एस. विरेश प्रभू, गुन्हे प्रकटीकरण – १ चे उपायुक्त अकबर पठाण, सहाय्यक पोलीस आयुक्त (डी-पश्चिम अतिरिक्त कार्यभार) संजय पाटील, मुंबई गुन्हे प्रकटीकरण शाखा कक्ष १० चे प्रभारी पोलीस निरीक्षक विनय घोरपडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक वाहीद पठाण, सहाय्यक पोलीस निरीक्षक धनराज चौधरी, पोलीस अंमलदार अजित पाटील, पोलीस अंमलदार अविनाश चिकणे, पोलीस अंमलदार सचिन ठोंबरे आदी पथकाने केली।

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *