Bihar Cricket Crime Delhi Education Entertainment Gujarat Health International Madhya Pradesh Maharashtra National Politics Social States Uncategorized Uttar Pradesh West Bengal

महिला सैनिक पोलीस प्रशिक्षण समारोप मुलींनो आपल्या गावाचे नाव उज्वल करा- भारतीय पत्रकार संघ महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष एम.एस.शेख

महिला सैनिक पोलीस प्रशिक्षण समारोप
मुलींनो आपल्या गावाचे नाव उज्वल करा- भारतीय पत्रकार संघ महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष एम.एस.शेख


पेण-भारतीय सैन्यात महिला पोलीस दलात भरती होऊन देशाची सेवा करण्याची मानसिकता आपल्यात निर्माण झाली त्या बद्दल तुमचे आणि सैनिक म्हणून देश सेवेला पाठविण्याची तयारी तुमच्या कुटुंबाने केली त्याबद्दल सर्वांचे अभिनंदन करतो व भरतीस आमच्या भारतीय पत्रकार संघ तर्फे शुभेच्छा देतो असें एम एस शेख यांनी आपल्या मार्गदर्शनात सांगितले
रायगडचा युवक फोऊडेशन व परमानंद आश्रम ट्रस्ट च्या सहयोगाने सैन्यात महिला पोलीस भरती प्रशिक्षण परमानंद आश्रम दादर-पेंण येथे 7 दिवसाचे आयोजित करण्यात आले होते.
समारोप कार्यक्रम प्रसंगी व्यासपीठावर रायगड भूषण जयपाल पाटील,ट्रस्ट चे अध्यक्ष क्रून्शकांत पाटील,माजी प्राचार्य नरेश मोकल,सचिव गोरखनाथ पाटील, हे उपस्थित होते,प्रारंभी मान्यवरांचा शाल,श्रीफळ देऊन आश्रमा तर्फे सत्कार करण्यात आला.
या वेळी जयपाल पाटील यांनी सांगितले की रायगड जिल्ह्यातील 30 मुली प्राथमिक चाचणी घेण्यात आली त्या मधून भरती योग्य 9 मुलीची निवड होऊन ग्राउंड, लेखी परीक्षा,धावणे सरावास 7 दिवसाचे निवासी शिबिरात डॉ. अर्चना जोशी,पशुधन अधिकारी पंचायत समिती पेंण, कु.प्राजक्ता वाघ,डी फार्मा, राजेंद्र गुंजाळ, आर.सी.एफ.अधिकारी, पी.टी. शिक्षक नरेश मोकल,जेष्ठ पत्रकार, प्रदिप पाटील,108 रूग्ण वाहिकेचे डॉ. अजित बर्गे,दत्ताराम पाटील इत्यादिनी मार्गदर्शन केले असे सांगितले.
यावेळी मुलींना भरती साठी लागणारी सरपंच, पोलीस चॅरित्र दाखला,कोविड नाहीचा सरकारी दाखला ची सर्व माहिती देण्यात आली महाराष्ट्र मध्ये हीभरती 12 ते 14 जानेवारी ला हडपसर पुणे येथे होतआहे यावेळी शिबिर अनुभव कु.पूजा पेडणेकर, कु.अनिशा घरत यांनी सांगितले.शिबीर यशस्वी होण्यासाठी कार्यध्यक्ष उदय पाटील,खजिनदार जनार्दन पाटील,कार्य.सदस्य भाईदास पाटील, सुरेश पाटील.विकास रणपिसे,108 पायलट संजय पालवनकर,सीता पाटील,काशी पाटील,ह.भ.प.विश्वनाथ पाटील यांनी केले

(फोटो- प्रशिक्षण शिबीर मध्ये मार्गदर्शन करताना भारतीय पत्रकार संघाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष फाइट अगेंस्ट क्रिमिनल अखबार संपादक. मोहम्मद सईद शेख, राष्ट्रीय सचिव जयपाल पाटील,प्राचार्य नरेश मोकल(फोटो-विकास रणपिसे)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *