Crime Health

पोलिसांनी अक्षरशः प्रवाश्यांना पाठीवर नेऊन सुरक्षित ठिकाणी सोडले । पोलिसांची नक्की भूमिका तरी काय 

पोलिसांनी अक्षरशः प्रवाश्यांना पाठीवर नेऊन सुरक्षित ठिकाणी सोडले । पोलिसांची नक्की भूमिका तरी काय 

संदिप कसालकर

सलग दोन दिवसांपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे जनजीवन हे विस्कळीत झाले होते. मुंबई च्या प्रत्येक कानाकोपऱ्यात पाणी साचून पूरस्थिती निर्माण झाली असतानाच नेहमीच कर्त्यव्यदक्ष असणाऱ्या मुंबई पोलिसांनी जनतेला कोणत्याही प्रकारचा त्रास न व्हावा यासाठी भर पावसात आपलं कर्तव्य बजावलं. त्यासाठी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता फक्त मुंबईकरांच्या सुरक्षेसाठी खंबीर पणे उभे राहिले. मुंबई पोलिसांच्या माणुसकीचे एक जिवंत उदाहरण काल डी. एन. नगर परिसरात पाहावयास मिळाले व त्याच चित्रीकरण इंडिया २४ तास च्या कॅमेऱ्यात कैद झाले.

मुंबईच्या डी. एन. नगर परिसरात काल ५ फूट एवढे पाणी साचले होते त्यात बी.एस.टी बसेस तसेच स्कुल बस या पाण्यात बंद पडल्या होत्या. त्यामुळे प्रवाशांना व शाळेतील विद्यार्थ्यांना बस मधून बाहेर पडणे कठीण झाले होते. हि परिस्थिती पाहता क्षणभरही विचार न करता डी. एन. नगर पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गनमे यांनी स्वतः प्रवाशांना व शाळेतील विद्यार्थ्यांना अक्षरशः आपल्या पाठीवर घेऊन सुरक्षित ठिकाणी पोहोचवले.

हा अविस्मरणीय प्रसंग खरंच डोळे दिपवून ठेवणारा होता त्यात हा प्रसंग पाहता काही प्रवाशांना अश्रू सुद्धा अनावर झाले होते. दरम्यान डी. एन. नगर पोलीस ठाणे चे इतर अधिकाऱ्यांनी सुद्धा प्रवाशांना बाहेर काढण्यात तेवढीच मदत केली. त्यामुळे आता मुंबई पोलिसांचा अनादर करणाऱ्या काही समाज कंटकांचा दृष्टिकोन हे दृश्य पाहून नक्कीच बदलेल अशी आशा आहे.

पोलिसांनी नक्की करायचं तरी काय ? ४८ तास सदैव तत्पर राहून जनसेवा करायची ? खड्डे बुजवायचे ? आग लागली तिथे पळायचं ? पाण्यात बुडणाऱ्या लोकांना वाचवायचं ? पोलिसांची नक्की भूमिका तरी काय आहे ? मग पालिका प्रशासन हे कशासाठी ? असे कित्येक प्रश्न एकंदरीत हि परिस्थिती पाहता उभे राहत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *