Bihar Cricket Crime Delhi Education Entertainment Gujarat Health International Madhya Pradesh Maharashtra National Politics Social States Uncategorized Uttar Pradesh West Bengal

पोलिस खात्यातील सिंघम पी. आय.श्री हेमंत पाटील यांचा पालक मंत्र्यांच्या हस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत सन्मान!

पोलिस खात्यातील सिंघम पी. आय.श्री हेमंत पाटील यांचा पालक मंत्र्यांच्या हस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत सन्मान!

पोलीस खात्यातील सिंघम म्हणून परिचित कर्तवयनिष्ठ व धाडसी अधिकारी सध्या शिरपूर पोलीस स्टेशन चे पी आय श्री हेमंत पाटील यांना केंद्रीय गृह मंत्रालय मार्फत त्यांनी धुळे येथे कार्यरत असताना बालिका अत्याचार प्रकरणी उत्कृष्ट तपास काम करून त्या केस चा छडा लावला म्हणून विशेष पोलीस पदक देऊन गौरव करण्यात आला आहे
२६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त धुळे येथे आयोजित शासकीय समारंभात पालक मंत्री ना. अब्दुल सत्तार यांच्या हस्ते पी. आय.श्री हेमंत पाटील यांना विशेष पदक व प्रशस्ती पत्र प्रदान करून त्यांचा सन्मान करण्यात आला. या प्रसंगी जि. प. अध्यक्ष श्री तुषार भाऊ रंधे, जिल्हाधिकारी श्री संजय यादव, जिल्हा पोलिस अधीक्षक श्री चिन्मय पंडीत,आमदार मंजुळा गावीत, जि. प. मुख्याधिकारी श्रीमती सी. वान्मती, शि. व. न. प. चे सी. ई.ओ. श्री अमोल बागुल आदी मान्यवर


उपस्थित होते.
पी. आय. हेमंत पाटील यांच्या विशेष पदक व सन्मान प्राप्त झाल्या बद्दल आमदार माननीय अमरीश भाई पटेल,आमदार श्री काशिराम दादा पावरा, नगराध्यक्षा सौ. जयश्री बेन पटेल,उपनगराध्यक्ष श्री भूपेशभाई पटेल, माजी नगराध्यक्ष व नगरसेवक श्री प्रभाकर राव चव्हाण, आर सी पटेल शिक्षणिक संकुल चे उपाध्यक्ष श्री राजगोपाल भंडारी ,भा ज पा राज्य कार्यकारीणी सदस्य बबन भाऊ चौधरी, यांच्या सह अनेक मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.
भारतीय पत्रकार संघाचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष एम एस शेख कार्याध्यक्ष राजेंद्र गर्दे,राज्य उपाध्यक्ष गोपाल मारवाडी,तालुका अध्यक्ष युवराज माळी,शहर अध्यक्ष राजेश मारवाडी व उपाध्यक्ष मंगेश माळी व भारतीय पत्रकार संघा चे पदाधिकारी यांनी पी.आय. हेमंत पाटील यांचे अभिनंदन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *