Politics

विकासाच्या नावाखाली झाडे तोडण्यापेक्षा पर्यायांचा विचार करावा – खासदार सुप्रियाताई सुळे

विकासाच्या नावाखाली झाडे तोडण्यापेक्षा पर्यायांचा विचार करावा – खासदार सुप्रियाताई सुळे

आरे मेट्रो कारशेडला खासदार सुप्रियाताई सुळे यांची भेट…

आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन जाणून घेतल्या समस्या…

मुंबई दि. ८ सप्टेंबर –
विकासाच्या नावाखाली झाडे तोडण्यापेक्षा पर्यायांचा विचार करण्याची विनंती राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रियाताई सुळे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

आरे वने ही मुंबईची फुफ्फुसे आहेत आणि शहराला आपण श्वास घेणारी शुद्ध हवा पुरवतो. त्यामुळे इथली झाडे तोडण्यास तीव्र विरोध असल्याचे खासदार सुप्रियाताई सुळे यांनी यावेळी सांगितले.

आपल्या आगामी पिढ्यांसाठी आम्हाला मुंबईतील ग्रीन पॅचेस वाचवावे लागतील असेही खासदार सुप्रियाताई सुळे यांनी बोलताना सांगितले.


आरे मेट्रो कारशेडच्या आंदोलनाला आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रियाताई सुळे यांनी भेट देत लोकांच्या समस्या जाणून घेतल्या.

मेट्रोसाठी आरे कॉलनीतील जंगल तोडण्याचा घाट सरकार घालत असून त्याला जोरदार विरोध केला जात आहे. दिवसेंदिवस या आंदोलनाचा व्याप वाढू लागला आहे.

याच आंदोलनाच्याठिकाणी आज राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रियाताई सुळे यांनी दुपारी भेट देत आरे कॉलनीतील लोकांशी संवाद साधून त्यांच्या समस्याही जाणून घेतल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *