Maharashtra Social

शिरपूर मर्चंट को-ऑपरेटिव बँक लिमिटेड च्या ऑनलाइन वार्षिक सभेस सभासदांचा विरोध सभा रद्द करण्यासाठी सहायक निबंधक व उपनिबंधक यांना निवेदन मार्च १८, २०२१

शिरपूर मर्चंट को-ऑपरेटिव बँक लिमिटेड च्या ऑनलाइन वार्षिक सभेस सभासदांचा विरोध सभा रद्द करण्यासाठी सहायक निबंधक व उपनिबंधक यांना निवेदन
मार्च १८, २०२१

 

शिरपूर प्रतिनिधी – शिरपूर तालुक्यातील नामांकित असलेली दि शिरपूर मर्चंट को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड या बँकेच्या होणाऱ्या ऑनलाईन वार्षिक सभेस सभासदांनी विरोध दर्शवला असून सदरची सभा रद्द करण्यात यावी यासाठी सभासदांना मार्फत सहायक निबंधक सहकारी संस्था शिरपूर व जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था धुळे यांना निवेदन देऊन मागणी करण्यात आली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की शिरपूर शहरातील दि मर्चंट को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड या संस्थेने दिनांक 25 मार्च रोजी ऑनलाइन मिटिंग द्वारे व्हिडिओ कॉन्फरन्सिंग ची ची सभा आयोजित केले आहे. मात्र सर्व सभासदांना बाबत अधिकृत माहिती नसून सभासदांना बँकेने वार्षिक नफा तोटा पत्रक देखील पाठवलेले नाही .कोरोना काळात देखील बँकेने कोणती सभा न घेता कामकाज केले मात्र किमान सभासदांना बँकेच्या वार्षिक अहवाल पाठवणे आवश्यक होते मात्र ते देखील पाठवले नाहीत. त्यामुळे कोणत्याही प्रकारचे अहवाल न पाठवता त्याची मंजुरी घेणे हे कृत्य बेकायदेशीर असून सदरची ऑनलाईन ची मिटिंग व सभा तात्काळ रद्द करण्याचे आदेश द्यावेत अशी विनंती या निवेदनातून करण्यात आली आहे .
सदर बँकेची सन 2019 20 मधील वार्षिक सभा झालेली नसून बँकेतील 2020-21 ची सभा सभासदांना विश्वासात न घेता अचानक घेण्याचे ठरवले आहे. सर्व सभासदांकडे अँड्रॉइड फोन किंवा झूम ॲप उपलब्ध नाही शिवाय कोणत्याही प्रकारचा अहवाल सभासदांच्या हाती नसल्यामुळे सभासदांना आपल्या अडीअडचणी व प्रश्न मांडता येणार नाहीत आणि म्हणून ही सभा रद्द करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे .
सदर सभा घेण्याच्या निर्णयाला हरकत घेण्यात आली असून सभासदांच्या हितासाठी वार्षिक अहवाल प्रसिद्ध करून तो प्रत्येक सभासदास पर्यंत पोहोचवून मगच सभा घेण्यात यावी तोपर्यंत सदर सभेला स्थगिती देण्यात यावी अशी विनंती या निवेदनातून करण्यात आली आहे .
सदरचे निवेदनावर गोपाल मारवाडी ,मोहन पाटील, युवराज माळी,मंगेश माळी, राजू मारवाडी, ए. ए. अग्रवाल, ईश्वर बोरसे ,उदयनराजे जाधव इत्यादी सभासदांनी स्वाक्षऱ्या केल्या आहेत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *