Health Maharashtra National

नाशिक : ऑक्सीजन टंचाईवर मात करण्यासाठी रेल्वेतर्फे ऑक्सीजन टॅंकर पाठविण्‍याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार नाशिक साठी उद्या शनिवारी (ता.२४) ऑक्सीजन टॅंकर घेऊन येणारी एक्सप्रेस येथील माल धक्क्यावर दाखल होईल.

नाशिक : ऑक्सीजन टंचाईवर मात करण्यासाठी रेल्वेतर्फे ऑक्सीजन टॅंकर पाठविण्‍याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार नाशिक साठी उद्या शनिवारी (ता.२४) ऑक्सीजन टॅंकर घेऊन येणारी एक्सप्रेस येथील माल धक्क्यावर दाखल होईल.

नाशिक रोड – गुड शेडला टॅकर उतरण्याची सोय
देशात आणि राज्यात ऑक्सीजन टंचाईच्या पार्श्वभूमीवर केंद्र शासनाने महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यासाठी विशाखापट्टणम येथून ऑक्सीजन पुरविण्याची सोय केली आहे. त्यानुसार काल गुरुवारी (ता.२२) पहाटे राज्यात कोळंबली येथे सात टॅंकर पोहोचले. त्यानंतर आता पुन्हा विझाग स्टील मधून महाराष्ट्रासाठी ऑक्सीजन टॅकर घेउन एक्सप्रेस निघाली आहे. विखाशापट्टणम येथून दोन दिवसांपासून रेल्वेने ऑक्सीजन पाठविण्याची तयारी सुरु आहे. कालपासून सुरु झालेल्या या रेल्वेद्वारे विविध भागात ऑक्सीजन पाठवित सोय केली जात आहे.राज्यात नाशिकसह सगळीकडे तुटवडा आहे. उद्या साधारण १०८ मेट्रीक टनाचा ऑक्सीजन टॅंकर नाशिकला पोहोचेल.

साधारण १०८ मेट्रीक टनाचा ऑक्सीजन टॅंकर
नाशिकला ऑक्सीजन मोठा तुटवडा असून वाढीव ऑक्सीजनची मागणी करण्‍यात आली आहे. त्यानुसार साधारण ३१ तासात नाशिकला उद्या सकाळी दहा पर्यत ऑक्सीजन टॅंकर घेउन येणारी एक्सप्रेस दाखल होईल. सकाळी नाशिक रोडला रेल्वेस्थानकापासून काही अंतरावर असलेल्या रेल्वे गुड शेड भागात सिंगल लाईनद्वारे ही एक्सप्रेस लोड करुन ऑक्सीजन टॅंकर लोड केले जातील तेथून मालधक्क्यावरुन हे टॅकर शहरातील विविध रुग्णालसाठी ऑक्सीजन पुरवितील.
रेल्वेने ऑक्सीजन आणण्याची तयारी सुरु आहे. त्यासाठी स्थानीक यंत्रणाही तयार आहे. उद्या सकाळी दहापर्यत एक्सप्रेस दाखल होईल. गुड शेड भागात ही एक्सप्रेस लोड होईल.

Leave a Reply