Maharashtra National Social

विहामांडवा पत्रकार संघाच्या वतीने संपादका वरील हल्ल्याचा निषेध.

विहामांडवा पत्रकार संघाच्या वतीने संपादका वरील हल्ल्याचा निषेध.

विहामांडवा प्रतिनिधी/इम्तीयाज शेख

दैनिक लोकपत्र चे कार्यकारी संपादक रवींद्रजी तहकिक यांनी आपल्या लिखाणातून” शेंदाड नार्याचा भैताड पोऱ्या ” या मथळ्याखाली लिखाण केले होते .मात्र हे लिखाण झोंबलेल्या माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या समर्थकांनी दैनिक लोकपत्र च्या औरंगाबाद कार्यालयात जाऊन कार्यकारी संपादक रवींद्र तहकिक यांच्यावर भ्याड हल्ला करत काळे फासण्याचा निंदनीय प्रकार केला. आशा हल्लेखोरांना पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल करून अटक करण्यात यावी ,नसता संपूर्ण मराठवाड्यात पत्रकार रस्त्यावर उतरून आपल्या न्याय हक्कासाठी आंदोलन करतील असा इशारा विहामांडवा पत्रकार संघानी दिला आहे .वास्तविक पाहता एखाद्या विषयावर लिखाण करणे हे संपादकांना स्वातंत्र्य आहे .अशा लिखाणाबद्दल कोणाचे मन दुखावले असतील तर ,त्यांनी लोकशाही मार्गाने निषेध करायचा होता, परंतु कार्यकारी संपादका वर हल्ला करणे लोकशाहीमध्ये अशोभनीय बाब आहे. त्यामुळे या घटनेचा विहामांडवा पत्रकार संघ जाहीर निषेध करीत आहे. या घटनेतील हल्लेखोरांना योग्य ती कारवाई झालीच पाहिजे ,भविष्यात अशा प्रकारचा हल्ला झाल्यास सर्वश्री प्रशासन जबाबदार असेल यासाठी प्रशासनाने योग्य ती कारवाई करावी . अशा प्रकारचे निवेदन विहामांडवा येथील पत्रकार संघाने तहसीलदारांना दिले आहे. यावेळी ग्रामीण पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम पा. थोटे, मराठी पत्रकार संघ पैठण तालुका उपाध्यक्ष अनिल पा. गाभुड, भारतीय पत्रकार संघाचे जिल्हा उपाध्यक्ष इम्तीयाज शेख, कैलास सातपुते, युनुस पठाण,जावेद शेख ,शिराज शेख, नितीन ब्रह्मराक्षस,किशोर धायकर, अमित पहाडे , शब्बीर शेख, इत्यादी पत्रकार बांधव उपस्थित होते.

Leave a Reply