Maharashtra National Social

समाधान मिसाळ यांनी मिळवली अमरावती जिल्ह्यातील जनविकास शिक्षण संस्था येओडा, महाविद्यालयाची प्रथम श्रेणी

समाधान मिसाळ यांनी मिळवली अमरावती जिल्ह्यातील जनविकास शिक्षण संस्था येओडा, महाविद्यालयाची प्रथम श्रेणी…

सोलापूर ( माळशिरस ) / अनिल पवार ( ब्युरो चिफ सोलापूर ) –

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्यातील जनविकास शिक्षण संस्था, येओडा येथील आर्टस् अँड कोमर्स महाविद्यालय येओडा यांचे वतीने घेण्यात आलेल्या “National Level World Environment Day Quiz & Pledge Ceremony” परीक्षेमध्ये माळशिरस तालुक्यातील कण्हेर येथील सर्वसामान्य कुटुंबातील समाधान विलास मिसाळ यांनी सहभाग घेतला होता. त्यामध्ये त्यांनी प्रथम श्रेणी प्राप्त करून जिल्हा, तालुक्यासह, आपल्या गावाचे, कुटुंबाचे नाव रोषण केले आहे. त्याबद्दल त्यांचे विशेष अभिनंदन करण्यात येत आहे.


तसेच काही दिवसांपूर्वीच त्यांनी आंतरराष्ट्रीय डिजिटल जर्नालिझम परीक्षेमध्ये घवघवीत यश मिळवले होते. त्यास काही दिवसच होत आहेत, तोपर्यंत दहा दिवसातच त्यांनी ही दुसरी परीक्षा प्रथम श्रेणीने प्राप्त केली आहे. त्यांच्या या यशाबद्दल विविध अधिकारी, पदाधिकारी, मान्यवरांकडून त्यांचे विशेष कौतुक केले जात आहे. तसेच त्यांना असेच यश मिळत राहो व त्यांनी गाव, तालुका, जिल्हा, राज्य आणि देशाचे नाव उज्वल करो अशा सदिच्छा देखील दिल्या जात आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *