Maharashtra National Social

पोलीस महासंचालक पदक प्राप्त इकबाल शेख सारखे पोलीस सोलापूरचे भूषण आहेत

पोलीस महासंचालक पदक प्राप्त इकबाल शेख सारखे पोलीस सोलापूरचे भूषण आहेत

शहर शिवसेनेने केला सन्मान

सोलापूर – सोलापूर ग्रामीण पोलिस दलात कार्यरत असणारे इकबाल अ. रशीद शेख यांनी कमी वयात नेत्रदीपक कामगिरी बजावत देशपातळीवर सोलापूरचा झेंडा फडकविला आहे असे गौरवोद़्गार शिवसेना जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे यांनी काढले.

शहर शिवसेनेच्या वतीने आयोजित इक्बाल शेख यांच्या सत्कार सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. सन्मानचिन्ह, शाल व नॕपकीन बुके देऊन शेख यांचा कार्यक्रमाचे आयोजक शहरप्रमुख गुरुशांत धुत्तरगांवकर व जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी जिल्हाप्रमुख गणेश वानकर, उपजिल्हाप्रमुख प्रताप चव्हाण, शंकर चौगुले, भीमाशंकर म्हेत्रे, बाळासाहेब माने, सिध्दू घोडके, सचिन गंधुरे, सुनील बळी, अनिल जमादार, सिध्दाराम खजुरगी, बसवराज जमखंडी आदींची प्रमुख उपस्थिती होती.
पुढे बोलताना पुरुषोत्तम बरडे म्हणाले की, अशाप्रकारचा सत्कार हा केवळ एका व्यक्तीचा सत्कार नसतो, तर तो त्याच्या आईवडिलांनी केलेल्या संस्कारांचा सत्कार असतो.
आजपर्यंत १० सुवर्ण, ७ रौप्य, ११ कांस्य व एक राष्ट्रीय पारितोषिक पटकावणारा, क्राईम ॲण्ड क्रिमिनल ट्रॕकिंग नेटवर्किंग सिस्टम (CCTNS) विशेष उल्लेखनीय कर्तबगारी बजावणारे इकबाल शेख यांच्या सारखे पोलीस आपल्या परिसरात राहतात हे आपलं भाग्यच आहे असं प्रतिपादन शिवसेना शहरप्रमुख गुरुशांत धुत्तरगांवकर यांनी केलं. ते म्हणाले की, निवृत्ती जवळ आल्यानंतर सेवा कार्यकाळ निष्कलंक पार पडलेल्यांना राज्याच्या सर्वोच्च पोलीस महासंचालक पदाने गौरविले जाते, मात्र उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर अल्पावधीतच हे पदक पटकाविणारे इक्बाल शेख म्हणजे सोलापूरचे भूषणच होय. गणेश वानकर यांनीही अहमद जावेद यांच्या कार्याचा दाखला देत शेख यांना शुभेच्छा दिल्या.

=================

*हा सत्कार माझ्यासाठी खूप विशेष : इकबाल शेख*

आजवर परजिल्ह्यात, परराज्यात अगदी मुख्यमंत्र्यांपासून, DGP, SP आदी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या हस्ते माझा सत्कार झाला. मात्र, शिवसेनेनं केलेला हा सत्कार माझ्यासाठी अतिशय विशेष आहे. कारण पहिल्यांदाच माझ्या जन्मदात्या आई-वडिलांसमोर माझा सन्मान माझ्या लोकांकडून होतोय. आणि हा सन्मान माझ्या जन्मदिनी होत असल्याने हा दुग्धशर्करा योग जुळून आला असं वाटतं.

– इकबाल अ. रशीद शेख
पोलीस हवालदार, सोलापूर ग्रामीण.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *