Crime Entertainment Health Politics

विहिरीत पाय घसरून पडल्याने एकाचा मृत्यु.. अब्दुल्लापूर तांडा येथील घटना

विहिरीत पाय घसरून पडल्याने एकाचा मृत्यु..
अब्दुल्लापूर तांडा येथील घटना

पैठण/प्रतिनिधी

पिण्यासाठी पाणी काढण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यांचा पाय घसरून विहिरीत पडून मृत्यू झाल्याची घटना आडुळ (ता.पैठण) शिवारात रविवार (दि.१७) रोजी सकाळी आठ वाजेच्या सुमारास उघडकीस आली.रमेश हरीदास राठोड वय ४६ वर्ष राहणार अब्दुल्लापुर तांडा असे मृत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे,

सध्या शेतीच्या मशागतीची कामे करण्याची लगबग सुरु आहे, शेतातील काम लवकर व्हावे यासाठी शेतकरी ट्रॅक्टर च्या सहाय्याने काम उरकून घेत आहे, अशातच रमेश राठोड हे ट्रॅक्टर घेवुन शनिवारी राञी शेत नांगरण्यासाठी गेले होते. नांगरणीसाठी शनिवारी रात्री स्वतःच्या शेतात गेलेले रमेश राठोड हे सकाळ पर्यंत घरी आले नसल्याने घरच्यांनी रविवारी दि,१७ रोजी सकाळी शोधाशोध केली असता गट नं ६३ मधील विहिरीमध्ये पाण्यावरर्ती रमेश राठोड यांच्या पायातील चपला तरंगत असल्याच्या दिसून आल्या, या घटनेची माहिती गावात कळताच ग्रामस्थांनी विहिरीकडे धाव घेतली, विहिरीत पाणी असल्याने विद्युत पंपाच्या सहाय्याने उपसा करून रमेश राठोड यांना ग्रामस्थांनी विहिरीतुन बाहेर काढुन आडुळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आणण्यात आले.

डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले,शवविच्छेदन डॉ सुरेंद्र कुलकर्णी, रोहिना सय्यद यांनी केले, शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आला, दुपारी दोन वाजता त्यांच्या मृतदेहावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले, त्यांच्या पश्चात पत्नी ,दोन मुले, आईवडील असा परिवार आहे,याअकस्मात मृत्यूची नोंद पाचोड पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे,

पुढील तपास पोलीस निरीक्षक अतुल येरमे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार कल्याण राठोड, फिरोज बरडे हे करीत आहे,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *