Entertainment Health Politics

शिवसेना अंधेरी पश्चिम विधानसभा तर्फे विभागातील नागरिकांच्या सेवेसाठी समर्पित.

शिवसेना अंधेरी पश्चिम विधानसभा तर्फे विभागातील नागरिकांच्या सेवेसाठी समर्पित.

शिवसेना विधानसभा अंधेरी पश्चिम ची संपूर्ण टीम अहोरात्र काम करत आहे. शिवसेना अंधेरी पश्चिम विधानसभा मोठ्या प्रमाणात कार्य करत असून संपूर्ण टीम अंधेरी पश्चिम विधानसभा क्षेत्रात एकात्मतेने जोमात सेवा पुरवत आहेत. सेवाकार्याचा लवाजमा बघत अनेक समाजसेवी संस्था मदतीसाठी पुढे सरसावल्या असून शिवसेना अंधेरी पश्चिम विधानसभा मार्फत आपल्या सेवा पुरवित आहेत. अनेक सामाजिक , खाजगी संस्था व स्वतंत्र व्यक्ती सहकार्य करत आहेत.

४२०० बेघर व गरजू लोकांना जेवणाची व्यवस्था नियमित करण्यात आली आहे. आजपर्यंत २००००० लोकांना लाभ झाला आहे

१२००० गरीब परिवाराना जीवनावश्यक खाद्यपदार्थ (तांदूळ, गहू, आटा, तुरडाळ, गोडतेल, साखर, चहापावडर, कांदे, बटाटे इ.) चे वाटप करण्यात आले आहे.

विभागातील पोलीस कर्मचारी, महापालिका, प्रशासकिय, बेस्ट कर्मचारी व लोकांना ३००००(तीस हजार) मास्क वाटप करण्यात आले आहेत.


विभागातील पोलीस, महापालिका, अत्यावश्यक सेवा देणारे कर्मचारी व विभागातील घरोघरी सॅनिटायझर वाटप करण्यात येत आहे

शिवसेना विधानसभा अंधेरी पश्चिम मधील १००००० (एक लाख) नागरिकांची वन रुपी क्लीनिक च्या माध्यमातून थर्मल (फिवर) स्क्रिनिंग करण्यात आले. शिवसेना उपनेत्या खासदार प्रियांका चतुर्वेदी व वन रुपी क्लिनिक चे संचालक डॉ. राहुल घुले यांच्या अमूल्य सहकार्याने थर्मल (फिवर) स्क्रिनिंग करण्यात आले


अहोरात्र सेवा देणाऱ्या हॉस्पिटल, महानगरपालिका, प्रशासकीय, पोलीस कर्मचारी, सेवाभावी लोक यांच्या दैनंदिनीत क्षणिक गोडवा आणण्यासाठी कसबे सुकेने निफाड नाशिक येथील ३००० किलो मधुर द्राक्ष चे वाटप करण्यात आले

युवासेना मार्फत आपत्कालीन परिस्थितीत परिसरातील गरोदर महिला, वयस्कर व्यक्ती, रुग्णांना रुग्णवाहिकेची मोफत सेवा देण्यात येत आहे

सध्याच्या घडीला दवाखान्यात रक्त कमी पडत असल्यामुळे आवश्यकतेनुसार शिवसैनिक कूपर रुग्णालयात रक्तदान करत आहेत.

अंधेरी पश्चिम युवासेना मार्फत स्वस्त ताजी भाजी मंडई ची व्यवस्था करण्यात आली विविध ठिकाणी भाजी मंडई लावून रास्त दरात भाजी उपलब्ध करण्यात येत आहे

कूपर रुग्णालयातील डॉक्टर, नर्स, कर्मचारी व खाजगी डॉक्टर यांना पी पी इ किट देण्यात आले

पोलीस बांधवांना कोरोना संक्रमण रोखण्यासाठी फेस शिल्ड चे वाटप

अवघ्या मुंबई ची भूक भागवणाऱ्या मुंबई चे डबेवाल्याना जीवनावश्यक अन्नधान्य वाटप करण्यात आले

जुहू चौपाटीवरील सफाई कर्मचाऱ्यांना अन्नधान्य वाटप करण्यात आले

रस्त्यांवरील मुक्या प्राण्यांना (कुत्र्यांना) खाद्य देण्यात येत आहे.

विभागातील सर्व इमारती व झोपडपट्टी मध्ये २० निर्जंतुकीकरण पंपाच्या आधारे फवारणी करून निर्जंतुकीकरण करण्यात आले आहेत

गरजेनुसार बिस्कीट वाटप, खाद्यपदार्थ वाटप, अत्यावश्यक सेवा, रुग्णसेवा, अन्य सेवा देत आहोत

शिवसेना विधानसभा अंधेरी पश्चिम च्या वतीने विभागातील रिक्षा युनियन च्या पदाधिकाऱ्यांना धान्य पॅकेट चे वाटप करण्यात आले.

“अंधेरी पश्चिम मधील वीरा देसाई येथे मजुरांचा समूह संकटात असून त्यांना तात्काळ अन्नधान्याची गरज आहे असे एका ट्विटर हँडल वरून पोस्ट करण्यात आली होती. सदर ट्वीटची तातडीने दखल घेत शिवसेना विधानसभा अंधेरी पश्चिम च्या वतीने युवसैनिक आकाश नगरकर यांच्या मार्फत मदत पोहचविण्यात आली.”

शिवसेना विधानसभा अंधेरी पश्चिम व अभिलाषा फाउंडेशन चे श्री मालावत यांच्यामार्फत अबूबकर चाळ ,पत्रावाला चाळ, गांवदेवी डोंगर परिसर, गिल्बर्ट हिल, प्रभाग क्र.७० मधील गरजू परिवाराना धान्य पॅकेट चे वितरण करण्यात आले.

“”शिवसेना नेते खासदार श्री गजानन कीर्तिकर, महाराष्ट्र राज्य परिवहनमंत्री विभागप्रमुख ऍड. अनिल परब व शिवसेना उपनेत्या खासदार श्रीमती प्रियांका चतुर्वेदी व शिवसेना विधानसभा अंधेरी पश्चिम ला मोलाचे मार्गदर्शन करून अमूल्य सहकार्य करत आहेत.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *