Health Politics

जळगांव जिल्ह्यातील धरणगावं येथे ११ वर्षीय बालक हा आकर्षणाचा केंद्र बिंदू ठरला आहे

जळगांव जिल्ह्यातील धरणगावं येथे ११ वर्षीय बालक हा आकर्षणाचा केंद्र बिंदू ठरला आहे


(प्रतिनिधी लियाकत शाह)
जळगांव जिल्ह्यातील धरणगावं येथे ११ वर्षीय बालक हा आकर्षणाचा केंद्र बिंदू ठरला आहे अवघ्या अकरा वर्षे वयोगटातील या मुलाने संपूर्ण कुराण मुखाग्र केल्याने सर्वांसाठी हा कुतुहलाचा विषय ठरला आहे त्या सोबतच ह्या छोट्याश्या हाफिज ने रमजान महिन्यात २६ दिवसाची तरावीह ची नमाज सुद्धा पठण केली आणि इमामची भूमिका बजावली काल रमजानची शबेकद्र असल्याने व कुराण पठण पूर्ण झाल्याने या छोट्याश्या हाफिजला नजराणा म्हणून मान्यवरांच्या उपस्थितीत काही रकम देण्यात आली व फुलांचा वर्षाव करण्यात आला हा हाफिज धरणगाव येथील भडंगपुरा येथील रहिवासी असून त्याचे नाव शेख अमान आसिफ मन्यार असे आहे. सत्कार करताना शाह समाज तालुका अध्यक्ष रहेमान शाह,

मुस्लिम महासभेचे महाराष्ट्र सचिव करीम खान व इतर मान्यवर उपस्थित होते सदर विद्यार्थी हा जिल्हा परिषद उच्च प्राथमिक उर्दू शाळा क्र.१ धरणगांव येथे इयत्ता सहावीचा विद्यार्थी असून त्याचे वर्ग शिक्षक नईम अहमद शेख चांद आणि शाळेचे मुख्याध्यापक शेख ऐनोद्दीन सय्यद हसन आणि सर्व शिक्षक वृंद यांनी सुध्दा हाफिज़ अमानचे अभिनंदन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *