Entertainment Health Politics Uncategorized

वर्धापन दिवस: _पाहता पाहता 21 वर्ष लोटली… या काळात पक्षाने अनेक चढ़-उतार अनुभवले. परंतु शरद पवारनामी

वर्धापन दिवस:
_पाहता पाहता 21 वर्ष लोटली… या काळात पक्षाने अनेक चढ़-उतार अनुभवले. परंतु शरद पवारनामी ‘सह्याद्री’ पाठीशी असल्याने पक्ष टिकला आणि संपला-संपला म्हणत असताना 80 वर्षाच्या योद्धयाच्या नेतृत्वात ‘फीनिक्स’सारखी पुन्हा भरारी घेतली… मतलबी लोक आले-गेले, आपटले…

निष्ठावान प्रत्येक चढ़-उतारात स्वाभिमानाने राहिले… पक्षाला सर्वच घटकांची साथ मिळाली; परंतु या घटकांचे काहीनाकाही हित असल्याने ते पक्षासोबत होते… निःस्वार्थपणे पक्षाच्या पाठीशी असलेला एकच घटक आहे- मुस्लिम समाज! आणि हे सर्वांना मान्य करावे लागेल. मुस्लिम समाज कुठलेही राजकीय वातावरण न पाहता पासून-पर्यंत पक्षाच्या मागे राहिला, हे नाकारता येणार नाही…

स्थानिक पातळीवरील नेत्यांचे अनुभव काहीही असले तरी अल्पसख्यांक समाज हा मा. पवार साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून पक्षाच्यामागे खंबीरपणे उभा आहे.

पक्षाची दुसरीही फ़ळीही उत्तम आहे आणि राज्य व देशभर पसरलेले कार्यकर्ते व साहेबांवर प्रेम करणाऱ्या लोकांमुळे पक्षाचे भवितव्य उज्वल आणि मजबूत राहणार, यात शंका नाही._


देशभरातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांना पक्ष स्थापनादिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…*💐💐💐💐💐💐

शेख निजामुद्दीन.मुंबई सेक्रेटरी राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *