Crime Health Uncategorized

अंधेरी पश्चिम चार बंगला येथील डायमंड युनिसेक्स स्पा अँड सलून वर गुन्हा दाखल

अंधेरी पश्चिम चार बंगला येथील डायमंड युनिसेक्स स्पा अँड सलून वर गुन्हा दाखल

जग भारत कोरोना ची महामारी कमी होण्याचे नावच घेत नाही आहे . महाराष्ट्र राज्य चे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी अनलॉक ची घोषणा केली असून त्यात ही काही व्यवसाय बंद ठेवण्याचे आदेश देखील दिले आहेत.

परंतु या आदेशाचे सर्रास उल्लंघन होताना दिसत आहे असाच एक प्रकार अंधेरी पश्चिम चार बंगला मधील रतन नगर परिसर येथे घडत होता. अनलॉक जरी सुरू असले तरी अजून स्पा अँड सलून यांना परवानगी नसताना देखील डायमंड युनिसेक्स स्पा अँड सलून आपला व्यवसाय खुले आम करत होते याची त्यांनी जाहिरात प्रसिद्ध सुधा केली त्याचे सर्व ग्राहकांना माहिती सोशल मीडिया चे माध्यम वापरून करण्यात आली होती.

रतन नगर मधील सजग नागरिक यांनी या बाबत वारंवार तक्रार करूनही डायमंड युनिसेक्स स्पा अँड सलून मालक आपला व्यवसाय सुरूच ठेवत असल्यामुळे त्यांनी सदरची तक्रार नागेश कळसगौंडे यांच्या निदर्शनास आणून दिली व वरिष्ठ पोलीस अधिकारी यांना सुधा याबाबत फोन करून तक्रार केली .

तक्रारी ची शहानिशा करण्यासाठी वर्सोवा पोलीस स्टेशन चे सहायक पोलीस निरीक्षक अविनाश जाधव यांनी ताबडतोब त्या ठिकाणी भेट दिली असता डायमंड युनिसेक्स स्पा अँड सलून सुरू असल्याचे लक्षात येताच त्याचे मालक यांच्या वर भारतीय दंड विधान कायद्या अंतर्गत विविध १८० ,२६९ ,२८० भारतीय दंड विधान ५१ ब नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.

फाइट अगेंस्ट क्रिमिनल आपल्या सर्व वाचकांना विनंती करत आहे की आपल्या आजूबाजूला असलेल्या चुकीच्या गोष्टीचा विरोध करा आणि त्याची तक्रार करा मुंबई पोलीस तुमच्या सोबत आहे. आपल्या अश्याच प्रकारच्या कोणत्याही विषयाची माहिती किंवा तक्रार करणे असल्यास आम्हाला संपर्क करा आम्ही आपला आवाज बनू.

One Reply to “अंधेरी पश्चिम चार बंगला येथील डायमंड युनिसेक्स स्पा अँड सलून वर गुन्हा दाखल

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *