Crime International Maharashtra National Politics Social States Uncategorized

औरंगाबादच्या दिव्य मराठी वृत्तपत्राच्या संपादक व वार्ताहरावरील खोटे गुन्हे मागे घ्या:  महाराष्ट्र लढा पत्रकार संघटना

औरंगाबादच्या दिव्य मराठी वृत्तपत्राच्या संपादक व वार्ताहरावरील खोटे गुन्हे मागे घ्या:  महाराष्ट्र लढा पत्रकार संघटना


(प्रतिनिधी लियाकत शाह)
बुलढाणा: महाराष्ट्र लढा पत्रकार संघटनाचे लुकमानशाह (प्रदेश अध्यक्ष) यानी जिल्हाधिकारी साहेब, बुलडाणा येथील निवेदन देण्यात आले व जर कही महाधिकारीचा दुष्पपरिणाम झाला तर संबंधित प्रशासन जबाबदार राहील, याची नोंद घ्यावी. या निवेदनात सादर करण्यात येते की, औरंगाबाद येथे कोरोनानाने नुसतं थैमान घातले आहे. कोरोना रोखायला जिल्हा प्रशासन असफल ठरले आहे. औरंगाबाद शहराच्या परिस्थीतीवर सविस्तर लेखाजोखा दैनिक दिव्य मराठीच्या माध्यमातुन आला होता. प्रशासकीय यंत्रणेचा हलगर्जीपणा आणि प्रतिबंधात्मक व्यवस्थेमधील उणिया त्यामध्ये सविस्तर मांडण्यात आल्या होत्या. यावर प्रशासकीय यंत्रणेने आपल्या व्यवस्थेत सुधारणा करण्याऐवजी दैनिक दिव्य मराठीच्या संपादक व वार्ताहर यांच्यावर खोटे गुन्हे दाखल केलेले आहे. सदरचे गुन्हे तात्काळ मागे घेण्यात यावे. सदरच्या घटनेमुळे लोकसेवकांच्या मनावर परिणाम झाला असून महामारीविरुद्ध चालु असलेले उपाययोजनाच्या काळात अडथळा निर्माण झाल्याचा आरोप उलट पोलीसांनी दैनिक दिव्य मराठीवर खापर फोडले आहे. वरील घडलेल्या घटनेचा महाराष्ट्र लढा पत्रकार संघटनेच्यावतीने या निवेदनाद्वारे गुन्हे दाखल करणारे प्रशासनाचा जाहीर निषेध करीत आहोत. तरी संबंधित विभागाने लोकशाहीचा चौथा स्तंभ माध्यमांना न्यायाच्यादृष्टीने होण्यासाठी वरील घटनेसंदर्भात संबंचित संपादक, प्रकाशक, वार्ताहर यांच्यावरील खोटे गुन्हे त्वरीत मागे घेण्यात यावे, अन्यथा महाराष्ट्र लढा पत्रकार संघटना लोकशाही मार्गाने रस्त्यावर उतरुन आंदोलन करेल आणि पुढील होणाऱ्याचा परिणाम शासन जवाबदार राहिल. महाराष्ट्र लढा पत्रकार संघटनेच्या (प्रदेश अध्यक्ष) लुकमानशाह, साबीर अली (राज्य उपाध्यक्ष) महमुद शाह (राज्य सचिव) तसेच महाराष्ट्र राज्य लढा पत्रकार संघटनाचे (राज्य प्रतिनिधि प्रमुख) लियाकत शाह सर.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *