Entertainment Health International Maharashtra National Social States Uncategorized

मढी शिवारातील शेरी परिसरातील बिबट्या अखेर जेरबंद….

मढी शिवारातील शेरी परिसरातील बिबट्या अखेर जेरबंद….

प्रतिनिधी वजीर शेख

पाथर्डी तालुक्यातील मढी परिसरातील येथे वनअधिकाऱ्याने पिंजरा लावला असता नरभक्षक बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद झाला. पाथर्डी तालुक्यातील हा चौथा बिबट्या जेरबंद झाला आहे.तरी आणखी किती आहेत हे सांगता येत नाही,म्हणून यासाठी अहमदनगर वनसंरक्षक श्री आदर्श रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली ही टीम कार्यरत आहे,सहाय्यक वनसंरक्षक किशोर सोनवणे,वनपरिक्षेत्र अधिकारी दादासाहेब वाघुलकर, वन परिमंडळ अधिकारी एम. वाय.शेख वन परिमंडळ अधिकारी गाढवे संगमनेरहून आलेल्या विशेष पथकाचे प्रमुख श्री संतोष पारधी नियत क्षेत्र अधिकारी संदीप कराळे,स्वप्नील निलाखे, एकनाथ खेडकर, आदिनाथ पिसे,मुबारक शेख, ज्योती शिरसाठ, कविता दहिफळे, विष्णू मरकड, राजू मरकड, मिठु अकोलकर,अंकुश पालवे,आर.के. पवार, बाबु घोरपडे,कानिफ वांढेकर, गणेश पाखरे ,समीर मोमिन, अशोक कुसारे, शंकर बर्डे, हरी बर्डे, शहानूर पठाण यांनी खूप परिश्रम घेतले.बिबट्या जेरबंद झाल्यानंतर पाहण्यासाठी परिसरातील लोकांची तोबा गर्दी झाली होती नंतर बिबट्या तपासणीसाठी बोरिवली मुंबई येथे पाठवण्यात आला असे एम. वाय.शेख सांगितले.बिबट्या पकडल्याचे कळताच परिसरातील नागरिकांनी वन अधिकारी व त्यांच्या टीमचे आभार मानले. यासाठी वनाधिकारी रात्रंदिवस फौजफाट्यासह गस्त घालत आहेत.कुठलाही फोन आला की ही टीम काही क्षणातच घटनास्थळी दाखल होते वन अधिकारी व त्यांच्या टीमचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *