Politics

आंबेडकरी चळवळीचे मातृछत्र हरपले – केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले

आंबेडकरी चळवळीचे मातृछत्र हरपले – केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले

मुंबई दि. 26 – (अनिल सकपाळ) आंबेडकरी चळवळीचे मुखपत्र ठरलेल्या दैनिक सम्राटचे संपादक बबन कांबळे यांच्या मातोश्री हौसाबाई गणपत कांबळे यांचे आज वयाच्या ८९ व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या निधनाने आंबेडकरी चळवळीचे मातृछत्र हरपले आहे अशा शब्दांत रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी दिवंगत हौसाबाई कांबळे यांना आदरांजली वाहिली आहे.
वरळी येथील इमारत क्र. 94 मधील त्यांच्या राहत्या घरी जाऊन ना. रामदास आठवले यांनी दिवंगत हौसाबाई कांबळे यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेऊन भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.


दिवंगत हौसाबाई कांबळे या जरी सम्राटकार बबन कांबळे यांच्या मातोश्री असल्या तरी त्या आंबेडकरी चळवळीतील सर्व पँथर कार्यकर्त्यांसाठी मातृस्थानी होत्या. आंबेडकरी चळवळीत काम करताना सर्वांचे माझ्याशी आपुलकीचे संबंध आले आहेत. माझ्या मतोश्रींचे नाव ही हौसा आई होते. बबन कांबळे यांच्या मातोश्री हौसाबाई कांबळे यांनि माझ्यावर पुत्रवत प्रेम केले. त्या आजारी असताना त्यांनी माझी खूप आठवण काढली होती.तेंव्हा त्यांना भेटण्यास मी मागील दोन महिन्यांपूर्वी वरळी येथील त्यांच्या निवासस्थानी गेलो होतो. अशी आठवण ना. आठवलेंनी यांनी सांगितली. आंबेडकरी चळवळीत सर्व कार्यकर्त्यांसाठी दिवंगत हौसाबाई कांबळे या मातृस्थानी होत्या. यांच्या निधनाने केवळ बबन कांबळे यांना मातृशोक झाला नसून आम्हा सर्वांनाच मातृछत्र हरपल्याची भावना निर्माण झाल्याचे शोकभावना ना रामदास आठवले यांनी पाठविलेल्या शोकसंदेशात व्यक्त केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *