Crime International Maharashtra National Social States Uncategorized

पंचवटीतील उड्डाणपुलावरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पोलिस यंत्रणा सज्ज: पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय

पंचवटीतील उड्डाणपुलावरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पोलिस यंत्रणा सज्ज: पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय

रविंद्र नेरकर / नाशिक
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक तीन या रस्त्यांचे के के वाघ महाविद्यालय ते हाॅटेल जत्रा पर्यंतच्या उड्डाण फुलांचे काम अंतिम टप्प्यात असून एक मे २०२१ पासून हा पूल रहदारीस खुला होणार आहे. १५ मार्च ते ३० एप्रिल पर्यंत द्वारका ते के के वाघ कॉलेज पुलावरील वाहतूक पूर्णपणे बंद राहील. सध्या काम सुरू असताना वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पोलिस यंत्रणा सज्ज असल्याचे पोलिस आयुक्त श्री दीपक पाण्डेय यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
हे काम १८ आक्टोंबर रोजी पूर्ण होणार होते परंतु करोना काळात परप्रांतीय मजूर स्थलांतरीत झाल्यामुळे सदर काम बंद पडले होते. १८ डिसेंबर ते २८ फेब्रुवारी २०२१ या कालावधीत वाहतूक कोंडी होणार नाही याची जबाबदारी पोलिस खात्याने स्विकारली आहे असे पोलीस आयुक्त दिपक पाण्डेय यांनी सांगितले.
यावेळी पोलीस उपायुक्त पौर्णिमा चौगुले, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे व्यवस्थापक बी एम साळुंके, प्रकल्प तांत्रिक सहाय्यक दिलीप पाटील, धनंजय जाधव आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *