Crime Maharashtra National

धक्कादायक ! मारहाण केल्याने महिलेचा गर्भपात; कोथरूड पोलिसांत तक्रार दाखल धक्कादायक ! मारहाण केल्याने महिलेचा गर्भपात; कोथरूड पोलिसांत तक्रार दाखल

March 19, 2021
धक्कादायक ! मारहाण केल्याने महिलेचा गर्भपात; कोथरूड पोलिसांत तक्रार दाखल
धक्कादायक ! मारहाण केल्याने महिलेचा गर्भपात; कोथरूड पोलिसांत तक्रार दाखल

पुणे : आपल्याला मारहाण झाल्याने गर्भपात झाल्याचा आरोप पुण्यातील महिलेने केला आहे. कोथरुड पोलिस स्टेशनमध्ये या संदर्भात तक्रार दाखल झाली आहे. २९ वर्षीय मनिषा भोसले आणि संतोष भोसले यांनी याबाबत तक्रार दिली आहे. पोलिसांनी याबाबत अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली आहे.

१७ तारखेच्या दुपारी ही घटना घडली आहे. संतोष आणि मनिषा भोसले हे दोघे उसाचे गुऱ्हाळ चालवतात. कोथरुड येथील गणेशकुंज सोसायटी मध्ये ते गाडा लावतात.

याठिकाणी गाडा का लावतो म्हणून या सोसायटीचे रहिवासी जयेश अनिरुद्ध कुलकर्णी आणि अनिरुद्ध उद्धव कुलकर्णी यांनी आपल्याला विचारणा केली. या दोघांनी आपल्याला व पत्नीला मारहाण केली. या मारहाणीमुळे पत्नीला ससून रुग्णालयात दाखल करावे लागले. त्यातुन आपल्या पत्नीचा गर्भपात झाल्याचा आरोप भोसले यांनी केला आहे. कोथरुड पोलिसांनी या प्रकरणी अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली आहे.

  • प्रतिनिधी
    पल्लवी प्रकाशकर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *