‘हिलाल अहमद’… एक अस्सल कश्मिरी मुसलमान !
आपल्या शत्रूवर हल्ला करण्यासाठी जी राफेल विमानं आज सज्ज आहेत.. त्या पाचही विमानांच्या पायलट टीमचा ‘कॅप्टन’ होता हिलाल अहमद ! भारतीय वायूसेनेचा ॲम्बेसिडर म्हणून फ्रान्समध्ये या पाचही विमानांचा ताबा घेऊन पाचही पायलटना टेकऑफसाठी आदेश देण्याचं काम हिलालनं केलं होतं.
…आणि हा माणूस कुणा नेत्याच्या किंवा पक्षाच्या मेहरबानीनं या पदावर पोहोचला नाही. स्वत:च्या टॅलेन्टवर, हिमतीवर आणि हृदयात असलेल्या अफाट देशभक्तीच्या जोरावर त्यानं हे पद मिळवलं आहे. जम्मूच्या नगरोटा सैनिक स्कूलचा ‘टॉपर’ असलेला हिलाल सुरुवातीला पायलट म्हणून वायूसेनेत भरती झाला. नंतर हळूहळू आपल्या टॅलेन्ट आणि जिद्दीच्या बळावर तो फ्लाइट लेफ्टनंट – विंग कमांडर – ग्रुप कॅप्टन अशा पायर्या चढत-चढत २०१९ ला ‘एयर कोमोडोर’ पदावर पोहोचला ! आज तो ‘एअर व्हाईस मार्शल’ आहे.
हे करताकरताच डिफेंस सर्व्हिसेस स्टाफ कॉलेज (डीएसएससी) ची पदवी घेतली.. एवढंच नव्हे, तर अमेरीकेच्या ‘एयर वॉर कॉलेज’मधून डिस्टिंक्शन मध्ये डिग्री मिळवली. एलडीए मध्य