गुन्हेगारी पार्श्वभूमी असताना देखील आर्म लायसन्स घेतलेल्यांना पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांचा झटका; तब्बल 111 लायसन्स रद्द, 200 लायसन्स धारकांना नोटिस

Shoaib Miyamoor
Spread the love

गुन्हेगारी पार्श्वभूमी असताना देखील आर्म लायसन्स घेतलेल्यांना पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांचा झटका; तब्बल 111 लायसन्स रद्द, 200 लायसन्स धारकांना नोटिस

पुणे : गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या आणि वेळेत रीन्यू न केलेल्या तब्बल १११ जणांची आर्म लायसन्स मागील वर्षभरात रद्द केली. एवढेच नव्हे तर फक्त वारस आणि स्पोर्टसमन साठी २३ लायसन्स दिल्याची माहिती पोलिस आयुक्त आमितेश कुमार यांनी दिली. पोलीस आयुक्त अमितेश कुमार (IPS Amitesh Kumar) यांनी चांगलाच झटका दिला आहे. तर नव्याने कारभार हाती घेण्यापूर्वी पोलिसांनी आर्म लायसन्सची खैरात केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

 

पुणे पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत २०२४ मध्ये घडलेले गुन्हे, पोलीस कारवाईची माहिती देण्यासाठी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी वरील माहिती समोर आली. अमितेश कुमार यांनी सांगितले की, पोलीस आयुक्तालयाच्या वतीने आतापर्यंत साडेपाच ते सहा हजार आर्म लायसन (बंदूक परवाना) देण्यात आली आहेत. २०२२ मध्ये २७९ तर २०२३ मध्ये २२८ लायसन्स देण्यात आली आहेत. २०२४ मध्ये फक्त २३ लायसन्स देण्यात आली. मात्र वर्षभरात तब्बल १११ लायसन रद्द करण्यात आली आहेत. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले आणि ज्यांनी वेळेत रिन्यू केले नाही त्यांना मुदत देवून स्पष्टीकरण मागविले. त्यांनी वेळेत स्पष्टीकरण न दिल्याने लायसन्स रद्द करण्यात आली आहेत. अजून २०० लायसन धारकांना नोटिसेस पाठवल्या आहेत. त्यांचेही खुलासे न आल्यास लायसन्स रद्द करण्यात येतील. अगोदरच्या दोन वर्षात मात्र एकही लायसन रद्द करण्यात आलेले नाही हे विशेष.

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *