कुर्ला लोकमान्य नगरात अजय समगीर यांच्या स्वखर्चातून रस्त्याच्या कामास सुरुवात.

admin

दै. सरकार टाईम : विवेक शिंदे.

कुर्ला ( मुं. उपनगर ): प्रतिनिधी

मुंबई, १४ मे २०२६ – कुर्ला वॉर्ड क्र. १६८ मधील लोकमान्य नगर परिसरातील रहिवाशांना गेल्या अनेक महिन्यांपासून गटाराच्या साचलेल्या पाण्यामुळे निर्माण झालेल्या दुर्गंधी आणि अपायकारक परिस्थितीचा सामना करावा लागत होता. रहदारीच्या मुख्य रस्त्यावर सतत साचणारे सांडपाणी हे स्थानिकांसाठी मोठे त्रासाचे कारण ठरत होते.

या गंभीर समस्येची पाहणी आज सकाळी १०.३० वाजता अजय समगीर यांनी केली. नागरिकांच्या विनंतीवरून त्यांनी कोणतीही सरकारी मदत न घेता स्वखर्चातून रस्त्याचे काम सुरू करण्याचा निर्णय घेतला आणि आज नारळ फोडून त्या कामाचा शुभारंभ करण्यात आला.

या प्रसंगी परिसरातील महिला भगिनींनी उपस्थित राहून आभार व्यक्त करत भावनिक प्रतिक्रिया दिली. “नेते फक्त मत मागायला येतात. प्रत्यक्षात आमच्या समस्यांकडे कोणी लक्ष देत नाही. मात्र अजय समगीर हे आमच्यातले आहेत. ते प्रत्येक वेळी संकटाच्या वेळी आमच्यासोबत उभे राहतात,” असे महिला भगिनींनी सांगितले.तसेच, त्यांनी पुढे म्हटले की, “आता आम्हाला आमचा नगरसेवक म्हणून अजय समगीर हवे आहेत. त्यांनी निस्वार्थपणे अनेक कामे केली आहेत. आम्ही सर्वजण त्यांच्या सोबत आहोत.”स्थानिकांनी दिलेल्या पाठिंब्याने व समाधानाच्या भावना व्यक्त करत अजय समगीर यांनी जनतेसाठी तत्परतेने सेवा करण्याचा आपला संकल्प पुन्हा एकदा अधोरेखित केला आहे.

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *