बोईसर, पालघर: बोईसर परिसरात एका महिलेने दिलेल्या तक्रारीनंतर राहुल ओमप्रकाश सिंह उर्फ सुगम याच्याविरुद्ध गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे. या प्रकरणात भारतीय न्याय संहिता (BNS) तसेच अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत विविध कलमांचा समावेश करण्यात आल्याने परिसरात मोठी चर्चा रंगली आहे.
पोलीस नोंदीनुसार, आरोपीविरुद्ध BNS कलम 69, 351(2), 352 तसेच अॅट्रॉसिटी कायद्याच्या कलम 3(1)(r), 3(1)(s) आणि 3(2)(v) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेऊन पुढील कारवाईसाठी पालघर जिल्हा व सत्र न्यायालयात हजर केले.
प्रकरणातील तक्रारदार महिलेची ओळख कायदेशीर कारणास्तव गोपनीय ठेवण्यात आली असून न्यायालयीन प्रक्रियेसाठी तिला नोटीसद्वारे उपस्थित राहण्याची सूचना देण्यात आली आहे.
या प्रकरणाचा तपास सुरू असून न्यायालयीन सुनावणीनंतर पुढील घडामोडी स्पष्ट होणार आहेत. आरोपीविरुद्ध करण्यात आलेले आरोप अद्याप न्यायालयात सिद्ध व्हायचे आहेत.

Loading comments...