BREAKING
FAC News
Back

मुंबई-ठाणे शिधावाटप विभागाची मोठी कारवाई; ९४.३७ लाखांचा मुद्देमाल जप्त

Tabish | | — views
मुंबई-ठाणे शिधावाटप विभागाची मोठी कारवाई; ९४.३७ लाखांचा मुद्देमाल जप्त

दोन टँकरमधून १४ हजार लिटर डिझेल आणि २५ हजार लिटर पेट्रोलियमसदृश द्रवपदार्थ जप्त; पाच आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल


पी.वी.आनंदपद्मनाभन

मुंबई,

मुंबई-ठाणे शिधावाटप विभागाच्या भरारी पथकाने नवी मुंबईतील तुर्भे परिसरात अवैधरित्या इंधन काढण्याच्या प्रकारावर कारवाई करत दोन टँकरसह सुमारे १४ हजार लिटर डिझेल आणि २५ हजार लिटर पेट्रोलियमसदृश द्रवपदार्थ जप्त केला आहे. या कारवाईत जप्त केलेल्या मुद्देमालाची एकूण अंदाजित किंमत ९४ लाख ३६ हजार ७०८ रुपये आहे. याप्रकरणी पाच आरोपींविरुद्ध तुर्भे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


नियंत्रक शिधावाटप व संचालक नागरी पुरवठा, मुंबई, चंद्रकांत डांगे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनियंत्रक शिधावाटप अंमलबजावणी गणेश बेल्लाळे यांच्या पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ही संयुक्त कारवाई केली.


डिझेलची वाहतूक करणाऱ्या WB 19 L 2981 या टँकरच्या आउटलेटमधून अवैधरित्या डिझेल काढून MH 46 BM 9202 या दुसऱ्या टँकरच्या इंधन टाकीत भरले जात असल्याची बाब निदर्शनास आल्यानंतर पथकाने धाड टाकली. या कारवाईदरम्यान दोन्ही टँकर आणि त्यामधील इंधनसदृश पदार्थ जप्त करण्यात आले.


या प्रकरणी दोन्ही टँकरचे चालक-मालक तसेच अरुण नावाच्या (पूर्ण नाव उपलब्ध नाही) व्यावसायिकाच्या मालकीशी संबंधित व्यक्तीसह एकूण पाच आरोपींविरुद्ध तुर्भे पोलीस ठाणे, नवी मुंबई येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास तुर्भे पोलीस करीत आहेत.


कारवाईत सहभागी अधिकारी-कर्मचारी


नियंत्रक शिधावाटप व संचालक नागरी पुरवठा, मुंबई यांच्या कार्यालयातील भरारी पथकाचे सहायक नियंत्रक शिधावाटप प्रदीप काळे, मुख्य निरीक्षण अधिकारी नागनाथ हंगरगे, शिधावाटप निरीक्षक अमोल बुरटे, दिपेंद्र परुळेकर, राहुल इंगळे आणि विकास नागदिवे यांनी या कारवाईत सहभाग घेतला. तसेच बेलापूर शिधावाटप कार्यालयाच्या शिधावाटप अधिकारी छाया पालवे आणि शिधावाटप निरीक्षक प्रकाश पराते, सचिन हेंबाडे, विक्रम धुमाळ व सागर गराडे उपस्थित होते.

मुंबई-ठाणे शिधावाटप विभागाची मोठी कारवाई; ९४.३७ लाखांचा मुद्देमाल जप्तमुंबई-ठाणे शिधावाटप विभागाची मोठी कारवाई; ९४.३७ लाखांचा मुद्देमाल जप्त

How did you feel about this news?

Related News

Comments

Loading comments...

Related News