BREAKING
FAC News
Back

नवी मुंबईत ‘नशा मुक्त शाळा’ अभियानाची सुरुवात रबाळे पोलिसांचा उपक्रम विद्यार्थ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद

FAC News Desk | | views
नवी मुंबईत ‘नशा मुक्त शाळा’ अभियानाची सुरुवात  रबाळे पोलिसांचा उपक्रम विद्यार्थ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद

नवी मुंबईत ‘नशा मुक्त शाळा’ अभियानाची सुरुवात

रबाळे पोलिसांचा उपक्रम विद्यार्थ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद

पनवेल ता. 9(बातमीदार) ‘नशा मुक्त भारत’ अभियाना अंतर्गत नवी मुंबई पोलिसांनी विद्यार्थ्यांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. रबाळे पोलीस स्टेशनच्या वतीने ‘नशा मुक्त शाळा’ या विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. या अभियानाचा शुभारंभ घणसोली येथील न्यू बॉम्बे स्कूल मध्ये करण्यात आला असून, विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेत नशामुक्त जीवनाची शपथ घेतली.

या उपक्रमाचे नेतृत्व पोलीस उपनिरीक्षक वर्षा कल्याण काळे यांनी केले असून, वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण सावंत यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांना अमली पदार्थांच्या दुष्परिणामांविषयी माहिती देण्यात आली. माहितीपट आणि पोस्टर्सच्या माध्यमातून व्यसनामुळे होणारे शारीरिक, मानसिक आणि सामाजिक परिणाम दाखवण्यात आले.या वेळी वर्षा काळे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला आजची तरुण पिढी ही देशाचे भविष्य आहे, पण व्यसनाधीनतेचा धोका या भविष्याला अंधारात ढकलतो. प्रत्येक शाळा नशामुक्त झाली तरच समाज सुदृढ बनेल.

विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रलोभनाला बळी न पडण्याचे आणि अमली पदार्थांचा वापर करणाऱ्यांविषयी पोलिसांना माहिती देण्याचे आवाहन वर्षा काळे यांनी केले.

शाळेच मुख्याध्यापक व शिक्षकवृदानी रबाळे पोलिसांच्या या उपक्रमाचे स्वागत केले. हा कार्यक्रम विद्यार्थ्यांना योग्य दिशा देणारा ठरेल असे मत व्यक्त केले.गुन्हेगारी रोखण्यासोबतच सामाजिक जबाबदारी पार पाडणे आमचे कर्तव्य आहे. पुढील काळात नवी मुंबईतील इतर शाळांमध्येही असे उपक्रम राबवले जातील. असे सुतोवाच वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण सावंत केले.

या ‘नशा मुक्त शाळा’ अभियानामुळे नवी मुंबईतील तरुण पिढी व्यसनांपासून दूर राहून सुदृढ समाजाच्या निर्मितीकडे वाटचाल करेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

How did you feel about this news?

Related News

Comments

Loading comments...

Related News