मागतेकरी महिलेच्या दीड महिन्याच्या बालिकेची चार लाख रुपयांना विक्री करणाऱ्या बालिकेच्या मागतेकरी आईसह डोंबिवलीतील तीन जणांना ठाणे येथील अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाच्या पथकाने कल्याण पश्चिमेतील रामदेव हाॅटेलजवळील सहजानंद चौक येथे मंगळवारी अटक केली.
कल्याण – कल्याण रेल्वे स्थानक परिसरातील एका मागतेकरी महिलेच्या दीड महिन्याच्या बालिकेची चार लाख रुपयांना विक्री करणाऱ्या बालिकेच्या मागतेकरी आईसह डोंबिवलीतील तीन जणांना ठाणे येथील अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाच्या पथकाने कल्याण पश्चिमेतील रामदेव हाॅटेलजवळील सहजानंद चौक येथे मंगळवारी अटक केली.
वैशाली किशोर सोनावणे (३५, रा. सिद्धार्थनगर झोपडपट्टी, कोपररोड, डोंबिवली) या मध्यस्थ महिलेच्या माध्यमातून हा विक्री व्यवहार होत होता. वैशाली मूळच्या मालेगावच्या आहेत. दीपाली अनिल दुसिंग (२७, रा. सिध्दार्थनगर झोपडपट्टी), रेखा बाळू सोनावणे (३२) या बालिकेच्या विक्री व्यवहारातील बालिकेची आई आहेत. त्या कल्याण पश्चिम रेल्वे स्थानक भागात राहतात. किशोर रमेश सोनावणे (३४, रिक्षा चालक) अशी महात्मा फुले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल व्यक्तींची नावे आहेत.