मुख्यमंत्रीपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर नागपूर येथे आयोजित स्वागत रॅलीमध्ये उपस्थित नागपूरकरांना संबोधित केले.
महायुतीला मोठ्या प्रमाणात आशीर्वाद देऊन आपली सेवा करण्याची संधी देणार्या महाराष्ट्रातील 14 कोटी जनतेचे आणि “एक है तो सेफ है” हा नारा देणाऱ्या मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचे आभार.
मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रात महायुतीला प्रचंड मोठा विजय मिळाला असून सर्वांनी दाखवलेल्या विश्वासाचा हा विजय आहे. महाराष्ट्राची सेवा करण्यासाठी आणि सामान्यमाणसाच्या जीवनामध्ये परिवर्तन घडवण्याची संधी मिळाल्याची जाणीव आम्हाला आहे. माझे सहकारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या सोबत आम्ही विकसित महाराष्ट्राचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध आहोत. आज मंत्रिमंडळाचा शपथविधी झाल्यानंतर हे सरकार 24 तास जनतेसाठी काम करणार आहे.